Mahavitaran Strike: ...तर 'मेस्मा' कायद्याअंतर्गत वीज कर्मचार्यांवर कारवाई; राज्य सरकारचा इशारा

Mahavitaran Strike: राज्य सरकारकडून अदानी कंपनीला वीज परवाना देण्याबाबत जोरदार हालचाली सुरु असल्याचा आरोप
Mahavitaran Latest News
Mahavitaran Latest NewsSarkarnama

Mahavitaran Strike News : महावितरणच्या महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या वीज कंपन्यांतील कर्मचाऱी मध्यरात्री 12 वाजण्यापासून तीन दिवसांच्या संप पुकारला आहे. यामुळे पुढील तीन दिवसांत राज्यातील वीजपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, आता महावितरणकडून या संपाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील जनतेला आश्वासित केलं आहे. याचदरम्यान राज्य सरकारने नोटिशीद्वारे संपावर गेलेल्या वीज कर्मचार्यांना इशारा दिला आहे.

महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे संचालक विश्वास पाठक (Vishwas Pathak) यांनी टि्वट करत महत्वाची वीज कर्मचार्यांच्या संपाविषयी महत्वाची माहिती दिली आहे. पाठक म्हणाले, राज्यातील जनतेने कुठेही भयभीत होण्याची आवश्यकता नाही. वीज कर्मचारी त्यांच्या संपाविषयीची भूमिका बदलतील याची खात्री आहे. अन्यथा पर्यायी व्यवस्था झाली असल्याने विद्युत पुरवठा अखंडित सुरु राहील याची खात्री बाळगावी असेही पाठक यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

Mahavitaran Latest News
Narendra Modi : मोदींच्या मंत्रीमंडळात शिंदे गटातील दोघांच्या गळात मंत्रीपदाची माळ पडणार..

तसेच राज्य सरकारने संपावर जाण्याआधीच महावितरण(Mahavitaran) च्या वीज कर्मचार्यांना एक नोटीस पाठवली आहे. त्यात महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परीरक्षा अधिनियम २०१७ अन्वये वीज पुरवठ्याशी संबंधित कोणतीही सेवा ही अत्यावश्यक सेवेमध्ये येत असल्याने त्या आवश्यक सेवेच्या परीरक्षा अधिनियमा अंतर्गत या सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सार्वजनिक हितास्तव संपावर जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

फडणवीसांसोबत वीज कर्मचार्यांची बैठक

महावितरणशी निगडित तीन कंपन्यांच्या कर्मचार्यांनी संपाची हाक दिली आहे. यामुळे राज्यातील वीज पुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे. आताच राज्यातील विविध भागात बत्तीगुल झाली आहे. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत संपातील वीज कर्मचार्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत संपावर तोडगा निघणार की संप पुढे कायम राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे. यावेळी फडणवीसांनी अतिरिक्त वीज पुरवठा तयार ठेवण्याचे आदेश ऊर्जा विभागाला दिले आहेत.

Mahavitaran Latest News
BJP Mission 45 : भाजपचे मिशन 45, मग शिंदे गटाच्या वाट्याला काय?

या कायद्यांतर्गत शासनाने नोटिफिकेशन काढले असून त्या अधिनियमा अंतर्गत संपावर जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांना संपावर जाता येणार नाही. आणि त्यांनी संप पुकारला तर त्यांच्यावर मेस्मा अंतर्गत कारवाई केली जाईल असा इशारा देखील दिला आहे.

राज्यातील वीज पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता

महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या वीज कंपन्यांतील कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप कर्मचार्यांकडून करण्यात आला आहे. मात्र, या संपामुळे राज्यातील वीजपुरवठ्यावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.

वीज कर्मचार्यांच्या संपामागचं कारण काय?

भांडुप कार्यक्षेत्रातील काही भागांत वीज वितरण परवाना मिळविण्यासाठी अदानी वीज कंपनीनं राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज केला आहे. आणि राज्य सरकार अदानी कंपनीला वीज वितरण परवाना देण्याविषयी राज्य सरकार सकारात्मक आहे. आणि अदानी कंपनीला वीज परवाना देण्याबाबत जोरदार हालचाली देखील सुरु असल्याचा आरोप देखील संपातील कर्मचार्यांनी केला आहे.

मात्र, अदानी कंपनीला वीज परवाना दिला गेला तर महावितरण कंपनी आर्थिक अडचणीत सापडून शासकीय वीजकंपन्यांचं खासगीकरण होईल अशी भीती कर्मचार्यांना आहे. त्यामुळे महावितरण कंपनीतील ३० कर्मचारी-कामगार संघटनांनी संपाचा पावित्रा घेतला आहे. हा संप पुढील तीन दिवस सुरू राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com