विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीची धावाधाव

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी येत्या 10 डिसेंबरला निवडणूक होत आहे.
Vidhan Parishad Election
Vidhan Parishad ElectionSarkarnama

मुंबई : विधान परिषदेच्या (Legislative Council Election) सहा जागांसाठी येत्या 10 डिसेंबरला (शुक्रवारी) निवडणूक होत आहे. यामध्ये मुंबईतील दोन जागांचा समावेश आहे. या निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) व भाजपचे (BJP) उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. तर काँग्रेसच्या नेत्याने अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली आहे. या निवडणुकीसह राज्यात इतर ठिकाणीही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

मुंबईच्या दोन जागांसह धुळे-नंदुरबार, वाशिम - बुलढाणा - अकोला, कोल्हापूर आणि नागपूर या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून होणारी ही निवडणूक आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडी कडून प्रयत्न सुरू करण्यात आल्याचे समजते. काँग्रेस आणि शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांची याबाबत बैठक झाल्याचे वृत्त आहे. कुठे उमेदवार मागे घेता येतील, ह्याची झाली चाचपणी केली जात आहे.

Vidhan Parishad Election
पाईपमधून पाणी नव्हे नोटा अन् दागिने आले बाहेर; ACB चे अधिकारीही चक्रावले (व्हिडीओ)

मुंबई महानगर पालिका मतदारसंघातून दोन जागांसाठी निवडणूक होत आहे. या जागांसाठी शिवसेनेकडून सुनील शिंदे आणि भाजपकडून राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही पक्षांकडून तिसरा उमेदवार दिलेला नाही. मुंबईत सुरेश कोपरकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. ते काँग्रेसचे नेते असल्याने त्यांचा अर्ज मागे घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, दिवंगत कॉंग्रेस नेते राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या पत्नी प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. भाजप उमेदवार संजय केणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची माहिती समोर आली आहे. संजय केणेकरांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर प्रज्ञा सातव यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड होणार आहे.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विनंती केल्यानंतर अखेर भाजपने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर विधानपरिषदेची ही पोटनिवडणूक होणार होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com