
Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar News) यांच्या निवास्थानी महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) बैठक नुकतीच पार पडली होती. या बैठकीला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख नेते उपस्थित राहिले होते. यात तिन्ही पक्षांनी आगामी निवडणुकांबाबत रणनीती आखण्याची चर्चा झाल्याचे नेत्यांनी सांगितले. मात्र आता यावरूचन ठाकरे गटाच्या गोटामध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमुळे आणि या मुलाखतीत केलेल्या दाव्यांमुळे ठाकरे गटात नाराजीचे वातावरण असल्याचे दिसत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांच्या माध्यमांमधील मुलाखतीमुळे शिवसेनेत अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे.
महाविकास आघाडीच्या बैठकीत झालेल्या जी चर्चा झाली. ज्या मुद्द्यांवर बोलले गेले, त्यापेक्षा वेगळ्या मुद्द्यांवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाहेर माध्यमात बोलत आहेत, असा आरोप ठाकरे गटाने (Thackeray GrouP News) केला आहे. चर्चेपेक्षा वेगळे मुद्दे मुलाखतीमध्ये बोलून आपल्या तिन्ही पक्षाच्या समन्वयामध्ये बाधा आणल्यामुळे महाविकास आघाडीत संभ्रम होऊ शकतो, असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे.
महाविकास आघाडीत बैठकीत एका गोष्टीवर चर्चा होते, बैठकीत एक ठरतं, आणि हे नेत्यांकडून मुलाखतीत वेगळं बोललं जातंय, यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. विशेष करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलेल्या मुलाखतीवरून भास्कर जाधव (Bhaskar Jadhav News) यांनी नाराजी बोलून दाखवली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.