`महाराष्ट्र बंद`साठी आघाडीचा जोर... भाजपला रस्त्यावरील ताकद दाखविणार!

लखीमपूर खेरीच्या (Lakhimpur Kheri) निमित्ताने भाजपच्या (BJP) विरोधात महाविकास आघाडीची पहिल्यांदाच रस्त्यावरील लढाई
`महाराष्ट्र बंद`साठी आघाडीचा जोर... भाजपला रस्त्यावरील ताकद दाखविणार!
महाविकास आघाडीतील नेतेsarkarnama

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे सरकार उद्या (११ ऑक्टोबर) रस्त्यावर उतरणार असून महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली आहे. या `बंद`मधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. हा बंद कडकडीत होणार असून केंद्र सरकारला या बंदमधून सरकारला इशारा देण्यासाठी जनेतेने स्वतःहून पाठिंबा देण्यासाठी बंदमध्ये सहभागी असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे.

महाविकास आघाडीतील नेते
महाविकास आघाडीतील सत्ताधारी पक्षांचा सोमवारी `महाराष्ट्र बंद`

लखीमपूर खेरी हिंचाराबद्दल राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत खेद व्यक्त करणारा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली. या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी देखील केले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रस हे तिन्ही पक्ष या बंद मध्ये सहभागी होणार असल्याने या बंदला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे शिवसेना या बंदमध्ये सहभागी असल्याने मुंबईवर या बंदचे परिणाम दिसण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीतील नेते
महाविकास आघाडीकडून 'महाराष्ट्र बंद'ची घोषणा अन् शरद पवारांनी केलं आवाहन

उद्याच्या बंद बाबत कॉंग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारविषयी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. मागील अनेक महिन्यांपासून देशाच्या कानाकोपऱ्यात शेतकरी आंदोलने होत आहे. पण केंद्र सरकार शेतकऱ्यांची बाजू समजून घ्यायला तयार नाही. केंद्र सरकारने लोकाभिमुख निर्णय घेण्याची गरज आहे. परंतु, त्याऐवजी एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाकडून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भरधाव वाहनाखाली चिरडले जाते. हा संपूर्ण प्रकार शेतकऱ्यांचा आणि विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. ही दडपशाही लोक सहन करणार नाहीत. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महाविकासआघाडी ने ११ ऑक्टोबर रोजी 'महाराष्ट्र बंद' पुकारला आहे. नागरिकांनी सुद्धा शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून या आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.

महाविकास आघाडीतील नेते
संजय राऊत म्हणाले, दसरा मेळाव्यावर मुख्यमंत्री घेणार लवकरच निर्णय

उद्याच्या बंदबाबत झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ता आणि अल्पसंख्यांक मंत्र नवाब मलिक यांनी, उद्याचा बंद हा कडकडीत होणार असल्याचा दावा केला. ते म्हणाले, ‘ शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने लखीमपूर खेरी येथे ज्या शेतकऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली त्या घटनेच्या विरोधात निषेधार्थ बंद पुकारलेला आहे. आज दिवसभर संध्याकाळपर्यंत आमचे तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते लोकांना भेटून उद्या या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी विनंती करणार आहेत. जनता या बंदमध्ये निश्चितपणे सहभागी होईल. हा बंद केंद्रातील शेतकरी विरोधी जुलमी सरकारच्या विरोधात आहे. शेत मालाच्या लुटीसाठी कायदे करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांच्या हत्या करत आहेत, या घटनांच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे.” असं मलिक यांनी सांगितले.

“केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाचा या घटनेत हात होता, असे इतके दिवस लोक सांगत असताना, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नव्हती. सर्वोच्च न्यायलायाने दोनवेळा हस्तक्षेप केल्यानंतर काल त्यांना अटक केली गेली. आमची मागणी आहे की केंद्रीय गृहराज्यमंत्री जे देशातील गृहखात्याचे मंत्री आहेत. त्यांच्या गृहराज्यात त्यांच्या गावात ही घटना घडली. अगोदर ते शेतकऱ्यांना चेतावणी देत होते. नंतर लोकांची हत्या करण्यात आली. आमची मागणी आहे की तत्काळ त्यांचा राजीनामा झाला पाहिजे. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या मागे संपूर्ण देश उभा आहे, हे दाखवण्यासाठी सर्वांनी बंदला पाठींबा दिला पाहिजे, सहभागी झालं पाहिजे,” असे आवाहन नवाब मलिक यांनी केले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in