'मविआ'च्या दोस्तीला नजर; विधानपरिषदेला 'तुझं तु-माझं मी' म्हणतं शिवसेनेचा सावध पवित्रा

Rajya Sabha Election | BJP | Shivsena | : संजय पवारांचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी
'मविआ'च्या दोस्तीला नजर; विधानपरिषदेला 'तुझं तु-माझं मी' म्हणतं शिवसेनेचा सावध पवित्रा
Mahavikas Aghadisarkarnama

मुंबई : राज्यातील राज्यसभा निवडणुकीचे (Rajya Sabha Election) निकाल नुकतेच जाहीर झाले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत भाजपचे (BJP) ३ आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) ३ उमेदवार निवडून आले. शिवसेनेच्या संजय पवार यांना परावभ स्विकारावा लागला. मात्र पवार यांच्या या पराभवानंतर महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळतं आहे. शिवसेनेकडून (Shivsena) पवारांच्या पराभवाचे खापर अपक्ष आमदारांवर फोडलं जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

याशिवाय या निकालाचा परिणाम आता आगामी विधानपरिषद निवडणूक निकाल आणि राज्याच्या राजकारणावर देखील पडण्याची चिन्ह आहेत. राज्यसभेतील पराभवाने नाराज असलेल्या शिवसेनेने विधान परिषद निवडणुकीत दोन्ही पक्षांनी आप, आपलं बघावं, असा सूचक संदेश राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला दिला असल्याची माहिती आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फारशी चिंता नसली तरीही काँग्रेसच्या गोटात मात्र चिंतेचं वातावरण आहे.

Mahavikas Aghadi
पवारांनीही फडणवीसांचं कौतुक केलं पण पंकजा मुंडेंचं मौन का? राजकीय चर्चांना उधाण

राज्यात येत्या २० जून रोजी १० जागांसाठी विधान परिषद निवडणूक होत आहे. यात महाविकास आघाडीचे ६, भाजपचे ५ आणि भाजप पुरस्कृत अपक्ष १ असे एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीत शिवसेनेने २, राष्ट्रवादी काँग्रेसने २ आणि काँग्रेसने २ उमेदवार उभे केले आहेत. या निवडणुकीत विजयासाठी २७ मतांचा कोटा आहे. तर विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे ४, शिवसेना २, राष्ट्रवादी काँग्रेस २ आणि काँग्रेस १ ची एक जागा निवडून येवू शकते.

शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे दोन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी अगदी कट टू कट मतं आहे. तर काँग्रेस त्यांचा ४४ आमदाऱ्यांच्या ताकदीवर १ उमेदवार सहज निवडून आणू शकतो. तर ४४ मतांतून पहिल्या पसंतीची २७ मते गेल्यानंतर पक्षाची १७ मते शिल्लक राहतात. त्यामुळे दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेसला आणखी १० मतांची गरज आहे, परिणामी त्यांची भिस्त पुन्हा एकदा महाविकास आघाडीला आणि त्यातही शिवसेनेलला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांवर असणार आहे. मात्र शिवसेने साथ न दिल्यास काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराची अडचण होऊ शकते.

Mahavikas Aghadi
महाडिकांचा असाही विजय; विधान परिषद घालवली पण राज्यसभा मिळवली!

अशात हे मतदान पूर्णपणे गोपनीय असल्याने राज्यसभा निवडणूकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीची उत्कंठा वाढली आहे. गोपनीय मतदान असल्याने महाविकास आघाडी आणि भाजप पुन्हा एकदा एकमेकांची मते फोडण्याचा प्रयत्न करताना दिसून येणार हे नक्की.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in