राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आघाडीची ऑफर भाजप स्वीकारणार का?

Rajyasabha Election 2022|BJP-Shivsena| राज्यसभेच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे.
Rajyasabha Election 2022
Rajyasabha Election 2022

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे.येत्या १० जून २०२२ रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक (Rajyasabha Election) होत आहे. त्यापुर्वी नुकतीच महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. (Rajyasabha Election 2022)

याबाबत बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आम्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यसभेचा उमेदवार मागे घेण्याची विनंती केली. त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने भाजपला एक ऑफर दिली, ती म्हणजे भाजपने शिवसेनेसाठी राज्यसभेची जागा सोडावी आणि शिवसेना भाजपसाठीसाठी विधानसभेची जागा सोडेल. तर भाजपनेही तुम्ही राज्यसभेची जागा सोडा आम्ही तुम्हाला विधानसभेची जागा सोडू, अशी ऑफर दिली. यावर एक तासाने फडणवीसांशी पुन्हा चर्चा करणार आहोत.चर्चेशिवाय मार्ग नसतो, आम्ही त्यांना एक ऑफर दिली त्यांनी एक ऑफर दिली.

Rajyasabha Election 2022
रोहित पवारांच्या मतदारसंघात बैलगाडे सुसाट : प्राजक्त तनपुरे म्हणाले...

या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांशी एक तासाने पुन्हा चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे तसेच, वरिष्ठांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ, असेही फडणवीसांनी सांगितले. त्यामुळे भाजप महाविकास आघाडीची ऑफर मान्य करणार आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, राज्यसभेच्या सहा जागांसाठी आणि विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेनेचे संजय पवार यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अर्ज भरला आहे. भाजपच्या धनंजय महाडिक यांनीदेखील अर्ज भरला आहे. त्यामुळे महाडिक उमेदवारी मागे घेतात की ही लढत होणार, हे चित्र आज स्पष्ट होणार आहे.

राज्यसभेसाठी भाजपने आपले तीन उमेदवार मैदानात उतरवले असून महाविकास आघाडीने चार उमेदवार दिले आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार का? याची चर्चा सुरू आहे. राज्यसभेसाठी शिवसेनेने आपला एक उमेदवार मागे घेतला तर भाजपदेखील विधान परिषदेसाठी फक्त चार उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करायची असेल तर शिवसेनेलाही एक पाऊल मागे जाऊन राज्यसभा निवडणूक बिनविरोध करावी लागेल.

विधानसभेतील आमदार या निवडणुकीसाठी मतदान करत असतात. त्यामुळे सध्या असलेल्या विधानसभा आमदारांच्या संख्याबळ पाहता भाजपचे दोन उमेदवारांचा सहज विजय होऊ शकतो. तर, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक-एक उमेदवार विजयी होऊ शकतो. त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांच्या बळावर शिवसेना सहाव्या जागेवर जिंकण्याची शक्यता आहे. पण भाजपला सहाव्या जागेसाठी 13 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे ही निवडणूक झाली तर ही लढच चुरशीही होईल असे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com