छत्रपती संभाजीराजेंना महाविकास आघाडीचा धक्का : शिवसेना सहावा उमेदवार देणार

Rajya Sabha Election 2022 : भाजपची रणनीती विरुद्ध महाविकास आघाडी
Sambhajiraje
SambhajirajeSarkarnama

मुंबई : राज्यसभेवर सर्व पक्षांनी पाठिंबा देऊन पाठवावे, असे आवाहन छत्रपती संभाजीराजे (Sambhaji raje) यांनी केले असले महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) त्यांना पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. शिवसेना सहाव्या जागेवार उमेदवार उभा करणार असल्याचे परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी आज स्पष्ट केले. त्यामुळे संभाजीराजे यांच्या पुन्हा खासदार होण्याच्या स्वप्नात अडथळा निर्माण झाला आहे.

Sambhajiraje
Sarkarnama Open Mic Challenge: मोदींची तुलना फक्त नेहरूंशीच: आ. परिणय फुके

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागा निवडून द्यायच्या आहेत. यात भाजपच्या दोन तर काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना यांचा एक उमेदवार पहिल्या मतांच्या कोटा घेऊन निवडून येऊ शकतात. सहाव्या जागेसाठी संभाजीराजे यांचा प्रयत्न होता. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली उमेदवारी जाहीर केली होती. अपक्ष आमदारांनी आपल्याला सूचक आणि अनुमोदक म्हणून पुढे यावे, यासाठी त्यांचे प्रयत्न होते. राष्ट्रवादी काॅंग्रेसने पाठिंबा दिल्याचा दावा त्यांच्या गोटातून करण्यात येत होता. आता मात्र तसे घडणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे संभाजीराजे यांना कोण पाठिंबा देणार, याची उत्सुकता आहे. भाजपनेही आपली अतिरिक्त मते कोणाला देणार हे गुलदस्त्यात ठेवले आहे.

Sambhajiraje
Sarkarnama open Mic challenge | रितेश देशमुख धीरज यांना Tips देतात का?

संभाजीराजे यांची पुरती कोंडी महाविकास आघाडीच्या निर्णयामुळे होऊ शकते. आपण निष्पक्ष म्हणून राज्यसभेत जाणार असल्याचा त्यांचा दावा असला तरी त्यांची उमेदवारी ही भाजपच्या रणनीतीचा भाग असल्याचे महाविकास आघाडीतील नेत्यांचे मत आहे. त्यामुळेच त्यांच्या उमेदवारीबाबत शरद पवार यांनीही नांदेड येथील पत्रकार परिषदेत फार स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. त्यांनीही जर-तर चे उत्तर देऊन त्या पत्रकार परिषदेत वेळ मारून नेली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com