बैठकीत ठरलं; महाविकास आघाडी दोन पार्ट्या करणार!

महाविकास आघाडीच्या Mahavikas Aghadi आमदारांची मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलवर बैठक झाली.
बैठकीत ठरलं; महाविकास आघाडी दोन पार्ट्या करणार!
Uddhav Thackeray, Sharad Pawarsarkarnama

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठीच्या निवडणुकीवरुन राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीमध्ये सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांची मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलवर बैठक झाली.

या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेसनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह तीनही पक्षांचे आमदार उपस्थित होते. या बैठकीला १२ अपक्ष आमदाराही उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदारांच्या बैठकीत बोलताना म्हणाले की ''ही लढाई शंभर टक्के जिंकणार आहे. आघाडीचा विजय निश्चित आहे. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक जिंकल्यानंतर पार्टी करु, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आमदारांना विश्वास दिला. आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील. राज्यसभा निवडणुकीला बिनविरोधची परंपरा आहे. मात्र, ही परंपरा मोडीत निघाली त्याचे दुःख आहे. कितीही प्रयत्न केले तरी आघाडीचे चारही उमेदवार राज्यसभेत जातील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Uddhav Thackeray, Sharad Pawar
सत्ता स्थापनेवेळी भाजपकडे असलेले दोन अपक्ष आता आघाडीत पण सात जणांनी ताणून धरलं!

महाविकास आघाडीचे काम सुरळीत सुरु आहे. आघाडी अशीच वाढवली पाहिजे, असे शरद पवार म्हणाले. तसेच आघाडी म्हणून आपण एकत्र राहिले पाहिजे. आपला कोणी आमदार फुटणार नाही, आपले उमेदवार जिंकणार असे पवार यांनी सांगितले.

विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता भाजप 2 आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा सहजपणे जिंकता येणे शक्यत आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार तर भाजपकडून धनंजय महाडिक तर मैदानात उतरले आहेत. शिवसेनेला आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मित्रपक्षांसह अपक्षांची मदत लागणार आहे. यामुळे शिवसेनेची आक्रमक मोर्चेबांधणी सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना ट्रायडंट हॉटेलवर ठेवण्यात आले आहे.

Uddhav Thackeray, Sharad Pawar
तेच हॉटेल, तीच वेळ; महाविकास आघाडी भाजपला पुन्हा दाखवणार अस्मान?

शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार निवडूण आण्यासाठी कंबर कसली आहे. यामुळे या बैठकीच्या माध्यमातून महाविकास आघाडी शक्तीप्रर्दशन करणार आहे. दरम्यान या बैठकीआधी बोलताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी संजय पवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, आमच्याकडे संख्याबळ आहे. चार संजय जरी असते तरी ते विजयी झाले असते, असे राऊत म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in