राणा दाम्पत्य ट्रोल; महाविकास आघाडीचे नेते तुटून पडले

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.
Navneet rana | Ravi Rana|Latest Marathi News
Navneet rana | Ravi Rana|Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून राणा दाम्पत्याला ट्रोल केले जात आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांनीही उडी घेत राणा दाम्पत्यावर टीका केली आहे. (MP Navneet Rana Latest Marathi News)

एका इंग्रजी वृत्तवाहिनीला राणा दाम्पत्याने नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना हनुमानाविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून त्यांची तारांबळ उडाल्याचे दिसते. हनुमानाचे नाव हनुमान कसे पडले, या प्रश्नाचे उत्तर त्यांना देता आले नाही, असं या व्हिडीओमध्ये दिसते. (MahaVikas Aghadi Leaders criticizes Navneet Rana and Ravi Rana)

Navneet rana | Ravi Rana|Latest Marathi News
हनुमानाचं नाव हनुमान कसं पडलं? नवनीत राणांची पंचाईत, व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनीही ट्विट केला आहे. शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी यावरून नवनीत राणांवर निशाणा साधला आहे. 'हनुमान चालीसा हातात धरून नाटके करणारी ही हिंदी चित्रपटातील दुय्यम प्रतीची अभिनेत्री, हिला हनुमान हे नाव कसे प्रचलित झाले, याची माहिती नाही आणि अक्कल शिकवायला निघाली, असं ट्विट कायंदे यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी व्हिडीओ ट्विट करून म्हटलं आहे की, 'कोणत्याही देवाचे सच्चे भक्त असतील तर त्यांना त्याविषयीची माहिती असते. पण हनुमान चालीसाचा वापर केवळ राजकीय फायद्यासाठी केला जात आहे. हा नुसता फार्स आहे.'

Navneet rana | Ravi Rana|Latest Marathi News
अमित शहांचा महिला IAS अधिकाऱ्यासोबतचा फोटो व्हायरल करणं निर्मात्याला पडलं महागात

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते बी. व्ही. श्रीनिवास यांनी व्हिडीओ ट्विट करत सर्व कट्टर भक्तांची स्थिती अशीच आहे, असा टोला लगावला आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनीही व्हिडीओ ट्विट केला आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीही ट्रोल केलं आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

मुलाखतीदरम्यान सुत्रसंचालिका नवनीत राणा यांना एक प्रश्न विचारतात. तुम्ही हनुमानाचे एवढे भक्त आहात, मग हनुमानाचं नाव हनुमान कसं पडलं?, हे सांगा. या प्रश्नावर नवनीत राणांना काय उत्तर द्यावे, हे सुचत नसल्याचे व्हिडीओ दिसते. रवी राणा यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांनीही मान खाली घातली. दोघांनीही हे माहिती नसल्याचे व्हिडीओ दिसते.

दोघांनाही उत्तर माहिती नसल्याचे पाहून सुत्रसंचालिकेने पुन्हा तोच प्रश्न विचारला. हनुमानाचं नाव आधी हनुमान नव्हते. ते कसं पडलं, असं त्यांनी विचारलं. त्यावर नवनीत राणा यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न करत सांगितलं की, तुम्ही आता इतिहासात नेणार असाल तर आम्ही माहिती घेऊ. इतिहास पुन्हा वाचू. मी हनुमान चालीसा वाचते, त्याविषयी नक्की बोलेन, असं उत्तर नवनीत राणा यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com