ठाकरे सरकारचा मोठा निर्णय: राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ

MNS| Raj Thackeray| मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वारंवार धमकीचे फोन येत होते.
MNS Raj Thackeray Latest News in Marathi, Latest Political News
MNS Raj Thackeray Latest News in Marathi, Latest Political News

Mahavikas Aghadi provid Y-plus security to Raj Thackeray

मुंबई : मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यांवर घेतलेल्या भूमिकेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांना वारंवार धमकीचे फोन येत होते. त्यावर राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी मनसे नेत्यांकडून करण्यात येत होती. त्यावर आज महाविकास आघाडी सरकारने राज ठाकरे यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. (Raj Thackeray Latest News in Marathi)

राज ठाकरे यांना याआधी वाय प्लस दर्जाचीच सुरक्षा होती. पण काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने त्यांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा काढून घेतली. अखेर राज्य सरकारने पुन्हा राज ठाकरे यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली. यात एक अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. राज ठाकरे यांच्या सुरक्षेविषयी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर राज्य सरकारने यासंदर्भात निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

MNS Raj Thackeray Latest News in Marathi, Latest Political News
"हिंदुजननायक कोणाची खासगी मालमत्ता नाही": आढळराव-पाटलांनी मनसेला ठणकावले

दरम्यान, दोन-तीन दिवसांपूर्वीच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती. राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांना धमकीचे पत्र आले होते. ते त्यांनी वळसे पाटील यांच्याकडे सुपुर्द केले. मात्र आज राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ केल्यानंतर राज्य सरकारडून देण्यात आलेल्या या सुरक्षेवरुन बाळा नांदगावकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकार थट्टा करत आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.

बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे याच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती पण. सुरक्षेत वाढ करण्याच्या नावाखाली राज ठाकरे यांच्या सुरक्षेत फक्त एक पोलीस आणि एक इन्स्पेक्टर वाढवला असल्याचा आरोप बाळा नांदगावकर यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर महाविकास आघाडी सरकार मनसेची थट्टा करत आहे आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com