Nashik Graduate Constituency : उद्धव ठाकरे नाशिकमध्ये भाजपवर डाव उलटवणार : ‘या’ उमेदवाराला देणार पाठिंबा?

सध्या मातोश्रीवर सुरू असलेल्या बैठकीला पाटील यांना पाचारण करण्यात आलेले आहे.
Shubhangi Patil
Shubhangi Patil Sarkarnama

मुंबई : धुळे येथील शुभांगी पाटील (Shubhangi Patil) या नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) उमेदवार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांना शिवसेनेकडून (Shivsena) मातोश्रीवर पाचारण करण्यात आले असून सध्या सुरू असलेल्या बैठकीत त्या सहभागी झाल्या आहेत, त्यामुळे शिवसेनेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्याची शक्यता आहे. (Mahavikas Aghadi candidate from Dhule's Shubhangi Patil Nashik graduate constituency?)

दरम्यान, उद्धव ठाकरे नाशिकमध्ये भाजपचा डाव त्यांच्यावर उलटवण्याच्या तयारीत आहेत. कारण, काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शुभांगी पाटील यांना शिवसेना आपला पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या मातोश्रीवर सुरू असलेल्या बैठकीला पाटील यांना पाचारण करण्यात आलेले आहे.

Shubhangi Patil
मोठी बातमी : राष्ट्रवादीला मोठा धक्का; लोकसभेतून खासदार बडतर्फ, संख्याबळ घटले

नाशिक पदवीधर मतदारसंघ हा महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षासाठी सोडण्यात आला होता. काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी आणि एबी फार्मही दिला होता. मात्र. डॉ. तांबे यांच्याऐवजी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेस पक्ष नाशिकमध्ये तोंडघशी पडला आहे.

Shubhangi Patil
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत चालताना हृदयविकाराचा झटका; काँग्रेस खासदाराचा मृत्यू

दरम्यान, धुळे येथील शुभांगी पाटील यांनीही नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांना आता मातोश्रीवरील बैठकीसाठी शिवसेनेकडून बोलावण्यात आले आहे. सध्या मातोश्रीवरील बैठकीला त्या उपस्थित आहेत. शिवसेना पाटील यांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील जो पक्ष आपल्याला पाठिंबा देईल, त्या पक्षाकडून मी निवडणूक लढवणार आहे, असे शुभांगी पाटील यांनी सांगितले.

Shubhangi Patil
Vikhe : विश्‍वासघात झाला की थोरातांच्या संमतीने अपक्ष उमेदवारी केली? मंत्री विखे-पाटलांचे प्रश्‍नचिन्ह

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही बिनविरोध होणार नाही. कारण मी माझ्या उमेदवारीवर ठाम आहे. मी ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये लढवणारच आहे. भाजपकडून मला एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, तो मुदतीत आला नसल्यामुळे मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

Shubhangi Patil
Kadam Vs Jadhav : गुहागरचा पुढचा आमदार शिंदे गटाचा करण्याची जबाबदारी माझी : रामदास कदमांचे जाधवांना चॅलेंज

कोण आहेत शुभांगी पाटील?

शुभांगी पाटील या धुळे येथील भास्कराचार्य संशोधन संस्थेत शिक्षिका म्हणून काम पाहतात. महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टुडंट्‌स असोसिएशनच्या त्या संस्थापिका आहेत. महाराष्ट्र नर्सिंग आणि पॅरामेडिकल एम्प्लॉईज असोसिएशनच्या त्या प्रमुख सल्लागारही आहेत. नंदूरबार जिल्ह्यातील मलगी येथील ग्रामविकास मंडळाच्या सचिवपदावर कार्यरत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com