Maharashtra Bhushan Award : महाराष्ट्र भूषण पुरस्कारात मोठा बदल : शिंदे फडणवीसांनी घेतला निर्णय!

Maharastra Bhushan Award : नवी नियमावली येण्याची शक्यता!
Maharastra Bhushan Award
Maharastra Bhushan Award Sarkarnama

Maharastra Bhushan Award : महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण या पुरस्काराच्या स्वरूपामध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. या मानाच्या पुरस्काराची रक्कम आता अडीच पटीने वाढवून ती २५ लाख रूपये करण्यात आलेली आहे. यापूर्वी ही रक्कम दहा लाख रूपये इतकी होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुरस्काराची रक्कम 10 लाखांवरून थेट अडीच पटीने वाढवत 25 लाख रुपये इतका केला आहे.

मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार (The Maharashtra Bhushan is a highest civilian award presented annually by the Government of Maharashtra State in India ) या संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीस बैठकीस राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्यमंत्री प्रधान सचिव व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खरगे, तसेच पुरस्कार समिती सदस्य व ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ विधीज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम, प्रा. शशिकला वंजारी, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत हे या बैठकीस ऑनलाईन उपस्थित होते.

Maharastra Bhushan Award
Thane News : ठाण्यात शिवसेना कोणी वाढवली? : शिंदे-ठाकरे गटात रंगला जोरदार कलगीतुरा!

पुरस्कारासाठी सुमारे 27 नावांचा प्रस्ताव -

या बैठकीमध्ये पुरस्कार स्वरुपाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या पुरस्कारासाठी जवळपास 27 नावांची यादी सरकारला प्राप्त झाली, या अनुषंगानेही चर्चा करण्यात आली. हा पुरस्कारात आणखी सकारात्मक बदल होऊन, तो अधिक दिमाखदार व्हावा, यासाठी काही नव्या स्वरूपाचे नियम असावे, असा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला.

राज्यात अनेक कर्तुत्वान लोक आहेत व्यक्तिमत्व आहेत. अनेकांनी राज्याला आपले योगदान दिले आहे. अशा अनेकांचा यासाठी विचार व्हावा, यासाठी नव्या नियमावलीची गरज आहे, असे बैठकीत ठरले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com