Prabhakar More Joins NCP : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची राजकारणात एन्ट्री; हाती बांधलं 'घड्याळ'!

Ajit Pawar : कोकण विभागाचं अध्यक्षपद आणि चित्रपट सांस्कृतिक विभागाची दिली जबाबदारी
Prabhakar More, Ajit Pawar
Prabhakar More, Ajit PawarSarkarnama

Prabhakar More Joins NCP : राज्यातील प्रेक्षकांना हसविणाऱ्या विनोदवीर-अभिनेते प्रभाकर मोरे यांनी आता राजकारणात 'एन्ट्री' घेतली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थित त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं आहे. कलाकारांच्या व्यथा मांडण्यासाठी आपल राजकारणात आल्याचे प्रभाकर मोरे यांनी यावेळी सांगितले.

Prabhakar More, Ajit Pawar
Jayant Patil News : उस्मानाबादमध्ये बोलले की त्याचा मोठा स्फोट होतो, येथे फार बोलायचे नसते : जयंत पाटील असे का म्हणाले?

महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमातून प्रभाकर मोरे (Prabhakar More) प्रेक्षकांनी प्रेक्षकांना खळखळवून हसविले. मगील काही महिन्यांपासून ते समाजकार्यात सक्रीय आहेत. त्यामुळे ते राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी पक्षप्रवेशाची घोषणा केली आहे. अजित पवार यांच्या स्वभावामुळे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असल्याचे मोरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Prabhakar More, Ajit Pawar
Phaltan News: निरा देवघरचे पाणी व्हाया धोम बलकवडी येणार; रणजितसिंह निंबाळकरांचा करिष्मा

प्रभाकर मोरे (Prabhakar More) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अजित पवारांनी प्रभाकर मोरे यांना कोकण विभागाची अध्यक्षपद आणि चित्रपट सांस्कृतिक विभागाची जबाबदारी दिली आहे. याबाबत अजित पवारांनी पत्रकार परिषेदेत घोषणा केली.

प्रभाकर मोरे यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमात आपल्या कोकणी शैलीतील संवाद आणि विनोदांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ते मूळचे रत्नागिरीतील आहेत. प्रभाकर मोरे यांनी निर्माते आणि लेखक संतोष पवार यांच्या नाटकांतून रंगभूमीवर पदार्पण केले होते. त्यांनी आतापर्यंत अनेक नाटकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Prabhakar More, Ajit Pawar
Koyana Dam News: कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सुटणार; शंभूराज देसाईंवर दिली जबाबदारी..

यावेळी प्रभाकर मोरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, “मला सर्वसामान्य कलाकारांसाठी काही तरी करण्याची इच्छा आहे. कलाकारांच्या व्यथा मांडण्यासाठी आणि कोकणातील कला संस्कृतीत असलेल्या काही अडचणी दूर करण्यासाठी, व्यवस्थित मार्गदर्शन करण्यासाठी राजकारणात आलो आहे. अजित पवार, सुप्रिया सुळे यांचा कलाकारांवर विशेष प्रेम आहे. अजित पवार यांच्या स्वभावामुळे मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे.”

दरम्यान काही महिन्यांपासून राष्ट्रवादीत अनेक कलाकारांनी प्रवेश केला आहे. यात मराठी-हिंदी चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज अभिनेते-अभिनेत्री, गायक-गायिकांचाही सहभाग आहे. त्यात ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, प्रिया बेर्डे, ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, सिद्धेश्वर झाडबुके, प्रियदर्शन जाधव, संभाजी तांगडे, गायिका वैशाली माडे, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, आसावरी जोशी अभिनेत्री आणि लावणी नृत्यांगना सुरेखा कुडची यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com