Maharashtra Winter Session 2022 : कोरोनाबाबत फडणवीसांनी केली मोठी घोषणा...

Maharashtra Winter Session 2022 : उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कोरोनावरील उपाययोजनांची आठवण यावेळी अजित पवार यांनी फडणवीसांनी करुन दिली.
covid vaccine
covid vaccine sarkarnama

Maharashtra Winter Session 2022 : कोरोनाने पुन्हा एकदा डोकेवर काढले असून पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे. सध्या चीनसह (China), अमेरिका (America), ब्राझील (Brazil) आणि जपानमध्येही (Japan) कोरोना विषाणूचा वेगाने वाढत आहे. कोरोनाचे सावट भारतावरही आहे. यावर आज हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सरकारने यावर काय उपाययोजना केली आहे, असा प्रश्न विचारला.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कोरोनावरील उपाययोजनांची आठवण यावेळी अजित पवार यांनी फडणवीसांनी करुन दिली. कोरोनाला राज्यात रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टास्क फोर्स नेमणार असल्याची घोषणा केली.

भारतामध्ये सध्या कोरोनाची सध्याची परिस्थिती सामान्य आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांमध्ये 131 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. भारतातील कोरोनाबाधितांचा आलेख दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी एका दिवसाला लाखोंच्या संख्येत आढळणारं नवीन कोरोना रुग्णांचं प्रमाण आता 131 वर पोहोचलं आहे. मात्र, अशावेळी नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. गाफील राहण्याची चूक करु नका, असं मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. पुणे जिल्ह्यातील रिंग रोड, पिंपरी-चिंचवड येथील शास्तीकराचा मुद्या आज मांडण्यात आला. तर आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांनी नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाबाबत माहिती दिली. त्यांनी आरोग्यविभागात साडेचार हजार पदे भरण्यात येणार असल्याची घोषणा केली.

अजित पवार म्हणाले, "नागपूरमधील वैष्णवी बागेश्वर मृत्यूची घटना लाजीरवाणी बाब असल्याचं म्हणत दोन वर्षे कोरोना असतानाही आरोग्य विभागाला जेवढा निधी लागेल तेवढा निधी देण्याचा निर्णय सरकारमध्ये असताना उद्धव ठाकरे आणि आम्ही घेतला होता. त्यामुळे आत्ताच्या शिंदे फडणवीस सरकारनेही शिक्षणाला प्राधान्य दिलेचं पाहिजे,"

covid vaccine
Girish Mahajan : अजितदादांकडून प्रश्नांचा भडिमार ; आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

"वैष्णवीला जेएमसी नागपूर येथे आणण्यात आलं होतं. त्यावेळी व्हेंटिलेटर तिथं उपलब्ध न झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. याठिकाणी असणारे डॉक्टर यांच्यावर आरोप झाले. त्यावेळी म्हैसेकर नावाच्या डॉक्टरांची समिती नेमली. त्याठिकाणी डीन गुप्ता यांना तत्काळ कार्यमुक्त केलं आहे आणि डॉ. सपकाळ जे व्हेंटिलेटर उपलब्ध करू शकले असते त्यांनी न केल्यामुळे त्यांना पदावरून हटवलं आहे," अशी माहिती आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांनी सभागृहात दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com