
Mumbai Political News : जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सुरू केलेल्या उपोषणाचा बुधवारी नववा दिवस आहे. 'आरक्षणाचा सरकारी आदेश हातात पडत नाही तोपर्यंत आंदोलन करणार. एक तर आरक्षण घेईन नाहीतर माझी अंत्ययात्रा निघेल', असा इशारा जरांगेंनी दिला आहे.
या आंदोलनाच्या 'इम्पॅक्ट'मुळे मंत्रालयात जोरदार हलचाली सुरू झाल्या आहेत. आरक्षणाबाबत मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विशेष बैठक बोलावली आहे. यात मराठा आरक्षणासाठी विधेयक आणण्यासाठी खल सुरू असल्याची माहिती आहे. या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित असल्याचे समजते. (Latest Political News)
जालन्यात मराठा आरक्षणासाठी (Manoj Jarange) मनोज जरांगेंनी सरकारला चार दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. यामुळे लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी सरकारने हालचाली वाढवल्या आहेत. यासाठी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी लगेच दुसरी विशेष बैठक घेतली. यात मराठा आरक्षणावर विधेयक आणण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. आता या बैठकीतून मराठा समाजाच्या हाती काय लागणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.
दरम्यान, जरांगेंच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कुणबी प्रमाणपत्राबाबत चर्चा झाली. याचा अहवाल सात दिवसात देण्याचे आदेश समितीला दिले आहेत. रिपोर्ट देण्यासाठी साधरण एक महिन्याचा कालावधी लागणार होता. आता अहवाल किमान सात दिवसांत द्यावा, अशा सूचना महसूल सचिव यांना दिल्या आहेत. या बैठकीनंतर लगेच शिंदेंनी विशेष बैठक बोलवली.
(Edited by Sunil Dhumal)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.