Energy Zone Project : आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर ; ठाकरे-शिंदे गटात पुन्हा कलगी-तुरा रंगणार ?

Energy Equipment Manufacturing Zone Project : पाच वर्षांसाठी या झोनला तब्बल 400 कोटी रुपये मिळणार होते.
Energy Equipment Manufacturing Zone Project News update
Energy Equipment Manufacturing Zone Project News updatesarkarnama

Energy Equipment Manufacturing Zone Project : महाराष्ट्रातून वेदांता - फॉक्सकॉन, टाटा - एअरबस, बल्क ड्रग पार्क हे प्रकल्प बाहेर गेल्याचा आरोप विरोधक करीत असतानाच आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने पुन्हा एकदा राजकारण तापणार असल्याचे चित्र आहे.आरोप -प्रत्यारोपाच्या फैरी लवकरच सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Energy Equipment Manufacturing Zone Project News update)

ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प मिळवण्यात मध्य प्रदेश सरकारने बाजी मारली आहे. मध्य प्रदेशच्या औद्योगिक विकास महामंडळाला तसे पत्रही केंद्र सरकारने पाठवल्याचे समजते. आठ राज्याच्या स्पर्धेत महाराष्ट्र मागे पडला आहे. या प्रकल्पाचा प्रस्ताव आघाडी सरकारच्या काळात केंद्राला पाठवला होता. त्यामुळे हा प्रकल्पही उद्धव ठाकरे यांच्या काळात महाराष्ट्राबाहेर गेल्याचे शिंदे - फडणवीस सरकारने म्हटलं आहे.

Energy Equipment Manufacturing Zone Project News update
Jitendra Awad : आव्हाडांवर कारवाईसाठी दबाब आणणारा तो 'चाणक्य' कोण ?

महाराष्ट्रासह ओडिशा, आंध्रप्रदेश, गुजरात, बिहार, मध्यप्रदेश,तामिळनाडू, तेलंगणा या आठ राज्यांनी केंद्र सरकारकडे यासाठी प्रस्ताव पाठवला होता. महाराष्ट्राकडून एमआयडीसीने हा प्रस्ताव पाठवला होता. एका संस्थेने या प्रस्ताव्याचे मुल्यमापन केल्यानंतर मध्यप्रदेश सरकारच्या प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या प्रकल्प सुकाणू समितीने 22 ऑक्टोबर 2022 रोजी मध्य प्रदेशात प्रकल्प उभारण्यास मंजुरी दिली आहे. 2 नोव्हेंबर 2022 रोजी मध्य प्रदेशच्या मुख्य सचिवांना मंजुरीचे पत्र मध्यप्रदेश सरकारला दिले आहे.

ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प काय होता ?

  1. केंद्र सरकारने फेब्रुवारी 2022 च्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाची घोषणा केली होती.

  2. पाच वर्षांसाठी या झोनला तब्बल 400 कोटी रुपये मिळणार होते.

  3. याची अधिसूचना 13 एप्रिल 2022 रोजी काढली गेली.

  4. एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट दाखल करण्याची शेवटची तारीख ही 8 जून 2022 होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com