Maharashtra Employee Strike: संपाचा तिसरा दिवस, अजूनही तोडगा नाही ; राज्यभरात रूग्णांचे हाल!

Old Pension Strike: रूग्ण टेबलावर, डॉक्टर संपावर, अनेकांचे नियोजित शस्त्रक्रिया रद्द..
Maharashtra staff strike : Old Pension Scheme :
Maharashtra staff strike : Old Pension Scheme :Sarkarnama

Old Pension Scheme: सरकारी कर्मचाऱ्यांनी संपाचा अस्त्र उगारले आहे. संपाचा आज तिसरा दिवस आहे. यातच संपकऱ्यांवर मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाईची टांगती तलवार आहे. संप सुरू असल्यामुळे सामान्यजनांचे फार हाल होत आहेत. अनेक रूग्णालयात रूग्णांचे हाल होत आहेत. सरकारी कामकाज ठप्प झाले आहे. दहावी - बारावी बोर्डाचे परिक्षा सुरळीतपणे पार पडत असले तरी, त्यांच्या पेपर तपासणीवर आता शिक्षकांनीच बहिष्कार टाकल्याने, आता निकाल वळेवर येण्याची शक्यता नाही. यामुळे अनेक कामकाजांवर संपाचा परिणाम होताना दिसून येत आहे.

Maharashtra staff strike : Old Pension Scheme :
Pakistani Citizen Arrest News : पुण्यात बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी तरुणाला अटक

रुग्णालये कोलमडली, प्रशासकीय काम खोळंबले, शेतीचे पंचनामे रखडले

संपाचा तिसरा दिवस उजाडला तरी सरकारकडून संपाबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला गेला नाही. यामुळे अनेक प्रशाकीय कामे ठप्पं पडून आहेत. अनेक रूग्णालयात रूग्णांचे हाल सुरू आहेत. यामुळे सरकारने संपावर लवकरात लवकर तोडगा न काढल्यास, परिस्थिती आणखी बिघडू शकते. याचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होत राहील. यामुळे लवकरात लवकर संपावर तोडगा निघावा, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कर्मचाऱ्यांच्या संपाचा रुग्णसेवेवर परिणाम, जिल्हा रुग्णालयातील नियोजित शस्त्रक्रिया रद्द :

धुळे जिल्हा रुग्णालयातील रूग्णांनी नियोजित केलेली शस्त्रक्रिया रद्द करावी लागली आहे. रूग्णालयातील सर्वच कर्मचारी संपावर गेल्याने, सध्या एनआरएचएम च्या केवळ 22 कर्मचाऱ्यांवरच जिल्हा रुग्णालय सुरू आहे. यामुळे रूग्णसेवेवर मोठा परिणाम झाला आहे.अत्यव्यस्थ आणि गंभीर आजाराच्या रूग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.

Maharashtra staff strike : Old Pension Scheme :
Ncp News : भाजप आमदाराचे 'लाड' पुरवले, राष्ट्रवादीकडून भ्रष्टाचाराचे आरोप!

अहमदनगर ग्रामीण रुग्णालयावर संपाचा परिणाम :

अहमदनगच्या रूग्णालयावरही संपाचा मोठा परिणाम झाला आहे. संपाचा सर्वाधिक फटका रूग्णालये, आरोग्य विभागाला बसला आहे. ग्रामीण भागात सरकारी रुग्णालये ओस पडत आहेत. रूग्णांचे हाल होत आहेत. अहमदनगरच्या रुग्णालयाला याचा मोठा फटका बसला आहे.

Maharashtra staff strike : Old Pension Scheme :
Old Pension Strike 'जुनी पेन्शन' संप मागे ; फडणवीसांना पत्र ; पण ..

महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद कर्मचारी संघटनेची संपातून माघार :

महाराष्ट्र राज्यातील विविध महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार यांच्या कामगार संघटनेने या संपातून माघार घेतलेली आहे. या संघटना आता संपात सहभागी मागे घेतला आहे. संपात सहभागी न होता, कामावर रूजू होऊन, काळ्या फिती लावण्यात येणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in