दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली : उद्या निकाल

दहावीच्या परीक्षेचा निकाल दुपारी एक वाजता आँनलाईन जाहीर होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली : उद्या निकाल
Maharashtra board SSC 10th Result 2022 Marathi NewsFile pics

मुंबई : गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांचीही प्रतीक्षा संपली आहे. उद्या (ता. १७) दहावीचा निकाल (SSC 10th Result 2022) जाहीर होणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज केली आहे. त्यांनी टि्वट करीत याबाबतची माहिती दिली आहे. (Maharashtra board SSC 10th Result 2022)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये (ssc) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल दुपारी एक वाजता आँनलाईन जाहीर होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

Maharashtra board SSC 10th Result 2022 Marathi News
नारायण राणेंना उच्च न्यायालयाचा दणका ; नोटीस योग्यच

दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. यामध्ये सुमारे 1,449,660 विद्यार्थी सहभागी झाले होते.

दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

मंडळाकडून 20 जून पर्यंत निकाल जाहीर होईल असे सांगण्यात आले होते आणि त्यानुसार उद्या म्हणजे 17 जून रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in