Eknath Shinde : ठाकरेंच्या विरोधात नवा डाव ; ज्येष्ठ नेत्यांना घेऊन शिंदे नवी चाल खेळणार ?

११ पैकी ८ नेत्यांचा अजूनही उध्दव ठाकरेंकडेच कल असल्याचे समजते.
Eknath Shinde
Eknath Shindesarkarnama

-दीपा कदम

मुंबई : शिंदे यांच्या गटात आमदार-खासदार सहभागी होत असताना आता ज्येष्ठ नेत्यांचे समर्थन मिळविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) प्रयत्नशील आहेत. त्यांनी नुकतीच शिवसेनेचे (shiv sena) ज्येष्ठ नेते, लिलाधर डाके, मनोहर जोशी, गजानन किर्तीकर यांची भेट घेतली. (Eknath Shinde latest news)

शिवसेनेच्या आमदार -खासदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यास यशस्वी ठरल्यानंतर मुख्यमंत्री आणि शिवसेनेतील बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे आता पक्षातील नेत्यांची मनधरणी करू लागले आहेत.शिवसेनेतील संसदीय पक्षाचे बहुमत शिंदेंकडे झुकलेले असले तरी पक्षातील प्राबल्य मात्र शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे झुकलेले असल्याने पक्षातील ११ नेत्यांपैकी जास्तीत जास्त नेत्यांचे समर्थन मिळवण्यासाठी एकनाथ शिंदेंचे प्रयत्न सुरू आहेत. कारण ११ पैकी ८ नेत्यांचा अजूनही उध्दव ठाकरेंकडेच कल असल्याचे समजते.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके आणि युतीच्या काळातील शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची भेट घेत त्यांचे समर्थन मिळावे यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. एकनाथ शिंदेंनी दोनच दिवसांपूर्वी गजानन किर्तीकर यांची भेट घेऊन त्यांची देखील मनधरणी केली आहे, किर्तीकर शिवसेनेचे नेते देखील आहेत.

Eknath Shinde
Abdul Sattar यांची कोंडी ; ठाकरेंमुळे मिळालेले मंत्रीपद शिंदे सरकारमध्ये गमावणार

शिवसेनेच्या नेतेपदी १३ जणांची नियुक्ती प्रतिनिधी मंडळाने केलेली आहे. त्यापैकी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या अधिकारात केली होती. १३ नेत्यांपैकी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले आहे. तर एकनाथ शिंदे, रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची पक्षाने हकालपट्टी केली असली तरी आपण शिवसेनेतच असल्याचा दावा शिंदे आणि अडसूळ यांनी केला आहे. तर आनंदराव अडसूळ, रामदास कदम यांनी मात्र पक्षातून हकालपट्टी होण्यापुर्वीच राजीनामा दिल्याने शिंदे गटाला त्यांचे समर्थन असले तरी प्राबल्य दाखवण्यासाठी त्यांचा उपयोग होणार नसल्याचे समजते.

किर्तीकरांची भुमिका गुलदस्त्यात

शिवसेनेच्या नेत्यांपैकी उध्दव ठाकरेंना लिलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, संजय राऊत, अनंत गिते आणि चंद्रकांत खैरे यांचा पाठिंबा आहे. तर शिंदे गटामध्ये रामदास कदम (पक्षाचा राजीनामा), आनंदराव अडसूळ यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. तर गजानन किर्तीकर यांनी अद्यापही त्यांची भुमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. शिंदे गटाकडे ते जाण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी ते अद्याप काठावर असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in