राजकारण तापलं : पवार हे मुख्यमंत्र्यांचा तर फडणवीस राज्यापालांच्या भेटीला

Maharashtra Politics पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीविरोधातील आपला हल्ला भाजपने तीव्र केला आहे.
Devendra Fadnavis-Bhagat Singh Koshyari
Devendra Fadnavis-Bhagat Singh Koshyarisarkarnama

मुंबई : देशातील पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण (Maharashtra Politics) अचानक तापलं आहे. त्याला कारण आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकालानंतरचे भाषण. भ्रष्टाचारी नेत्यांच्या विरोधात कारवाई करताना प्रादेशिकता, धर्म आणि पंथ यांच्या आधारे विरोध केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. (Devendra Fadnavis meets Governor Koshyari)

त्यांचा हा इशारा महाराष्ट्राकडे होता, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे भाजप आता महाराष्ट्रात केंद्रीय संस्थांच्या कारवाया वाढवील, अशी शंका व्यक्त होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचीही तातडीने वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. राज्याचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. या वेळी काय चर्चा झाली ते समजू शकले नाही पण भाजपच्या हल्ल्याला कसे तोंड द्यायचे, यावर त्यात चर्चा झाली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह बाॅम्बला उत्तर देण्याबाबतचे भूमिका यात ठरली असल्याचे बोलले जात आहे.

Devendra Fadnavis-Bhagat Singh Koshyari
महापालिका इच्छुकांच्या उरात पुन्हा धडकी : दोन सदस्यांचा प्रभाग करण्याच्या हालचाली

दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांच्यासह भाजपनेते राज्यपालांच्या भेटीला गेले. राजभवनावर नेमक्या काय घडामोडी घडणार, काय चर्चा होणार याबद्दल अद्याप कुठलीही माहिती नसली तरी, या हालचालींना वेग आला आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्रकारांनाही याबाबत प्रश्न विचारले. त्यात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार का, असा एक प्रश्न आता हमखास विचारला जात आहे. नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे आज एकनाथ शिंदे, हसन मुश्रीफ आणि विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यपालांच्या भेटीला गेले होते. निवडणूक आयोगाचे प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकारकडे घेण्यासाठीच्या विधेयकावर स्वाक्षरी करण्याची विनंतीसाठी ही भेट झाली. राज्यापलांनी त्यावर सही केली. त्यानंतर पत्रकारांनी भुजबळ व इतर मंत्र्यांना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का, हा सवाल केलाच. महाविकास आघाडीला 170 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता या मंत्र्यांनी फेटाळली.

Devendra Fadnavis-Bhagat Singh Koshyari
Video: प्रत्येक जिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसिन केंद्र उभारण्यात येईल; अजित पवार

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आगामी २५ वर्षांच्या देशाच्या उज्ज्वल भविष्याची आखणी करणारे आहेत, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. येणाऱ्या काळात भारतात घराणेशाहीच्या, भ्रष्टाचाराच्या राजकारणाचा सूर्यास्त होईल, हे या निवडणुकीतून दिसल्याचे मोदींनी ठणकावून सांगितले.. भ्रष्टाचारावर कारवाई केली तर, असे लोक आरडाओरडा करून व एकजूट होऊन तपास करणाऱ्या संस्थांवरच दबाव टाकतात हे देशाचं दुर्दैव आहे, असेही मोदी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com