Politics : महाराष्ट्राच्या राजकारणाची नवी नांदी; ठाकरे गट - वंचित युतीची अधिकृत घोषणा

Uddhav Thackeray & Prakash Ambedkar : देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar Sarkarnama

Thackeray Group And Vanchit Bahujan Aaghadi Alliance : ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी युतीवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आली आहे. उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्यात शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

मुंबईत उध्दव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गट व वंचित बहुजन विकास आघाडीच्या युतीची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या युतीसंदर्भात घोषणा केली आहे.

Prakash Ambedkar
VijayDada Meet Pawar : विजयदादा बारामतीत जाऊन शरद पवारांना भेटले....

यावेळी उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले,आंबेडकर आणि ठाकरे या नावाला इतिहास आहे. आमचे आजोबा एकमेकांचे समकालीन आणि एकमेकांचे सहकारी होते. दोघांनीही त्या काळातील वाईट प्रथांवर प्रहार केले. आताही राजकारणात वाईट प्रघात सुरू आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत. देश प्रथम हा मुद्दा महत्त्वाचा घेऊनच देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.

आज जे काही देशात चालू आहे ते तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. काल-परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येऊन गेले. निवडणुका आल्यानंतर गरिबांचा उदोउदो करायचा. गरिबांनी मतदान केल्यानंतर ते रस्त्यावर येतात. तर दुसरीकडे यांची उड्डाणं चालू होतात. हे सगळं थांबवण्याची गरज आहे. म्हणूनच आम्ही एकत्र आलो आहोत असंही ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

Prakash Ambedkar
Chandrakant Patil: ''...म्हणून गाफील न राहता कमळ चिन्हच उमेदवार समजून भाजपची पोटनिवडणुकीसाठी तयारी सुरु

प्रकाश आंबेडकर म्हणाले, शरद पवार यांचं आमच्या युतीवरचं विधान पाहिलं. आमच्यात शेतातलं भांडण नाही, मुद्द्यांचं भांडण आहे. पण काँग्रेस व राष्ट्रवादी आमच्यासोबतची युती स्वीकारतील अशी अपेक्षा बाळगतो.सध्या देशात सध्या बदला घेण्याचं राजकारण सुरु आहे. तसेच ईडीच्या माध्यमातून देशातील राजकीय नेतृत्व संपवण्याचा घाट सध्या घातला जात आहेत. सध्या देशाचं नेतृत्व करणारं एकही राष्ट्रीय नेतृत्व नाही. याचवेळी नरेंद्र मोदींनी स्वत: च्या पक्षातील नेतृत्वही संपवलं आहे अशी टीकाही आंबेडकरांनी यावेळी केली.

उध्दव ठाकरे म्हणाले, ठाकरे वंचित युतीविषयी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत चर्चा झाली. त्यात प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेण्याबाबत महाविकास आघाडीतील कुणाची ना नाही असं दिसत आहे. पण आंबेडकरांनी त्यांच्यातील आणि शरद पवारांसोबतच्या संबंधांवर त्यांनी भाष्य केलं. पण तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेस आम्ही शिवसेना एकत्र येतील असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण आम्ही तीन वर्ष ताकदीनं सरकार चालवून दाखवलं. त्यामुळे हेतू चांगला असेल तर सगळं काही चांगलं होतं. पण हिंमत असेल तर निवडणुका घेऊनच दाखवाव्यात असं आव्हानही ठाकरेंनी दिलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in