Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदे- आंबेडकरांमध्ये बंद दाराआड खलबतं; वंचित कुणासोबत ठाकरे की शिंदे?

Eknath Shinde & Prakash Ambedkar News: तब्बल अडीच तासांच्या मेगा बैठकीत नेमकी काय चर्चा
Eknath Shinde, Prakash Ambedkar, Uddhav Thackeray
Eknath Shinde, Prakash Ambedkar, Uddhav Thackeray Sarkarnama

Eknath Shinde & Prakash Ambedkar News: काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि उध्दव ठाकरे यांच्यात युती संदर्भात चर्चा झाल्या होत्या. यामुळे राज्याच्या राजकारणात भीमशक्ती व शिवशक्तीचा प्रयोग पुन्हा पाहायला मि़ळणार असल्याचं बोललं जात होतं. तसेच प्रकाश आंबेडकरांनी आपण ठाकरे गटासोबत युतीचे संकेत देखील दिले होते. मात्र, याचदरम्यान राज्यातील राजकारणातील मोठी घडामोड समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात बंद दाराआड तब्बल अडीच तास चर्चा झाल्याचं समोर आलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात बुधवारी(दि.११) रात्री वर्षा निवासस्थानी ही महत्वपूर्ण चर्चा झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चाललेल्या तब्बल अडीच तासांच्या मेगा बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याविषयी अद्याप स्पष्टता नाही. मात्र, शिंदे आणि आंबेडकर यांच्यात राजकीय मुद्दयावंर चर्चा झाल्याची माहिती आहे. या ठाकरेंशी युतीच्या चर्चा सुरू असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी अचानक एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Eknath Shinde, Prakash Ambedkar, Uddhav Thackeray
Sada Sarvankar News : 'ती' गोळी शिंदे गटातील आमदाराच्या बंदुकीतूनच सुटली..

या बैठकीत प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे गटासोबत युती करु नये याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग्रही विनंती केली असल्याची माहिती आहे.तसेच आंबेडकरांनी आपण भाजपसोबत जाणार नसल्याची भूमिका स्पष्ट केल्यामुळे त्यांनी शिंदेगटासोबत यावं यासाठी जोरदार हालचाली सुरु आहे. काल वर्षा निवासस्थानी झालेल्या भेटीत याच विषयावर चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आता काय निर्णय घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Eknath Shinde, Prakash Ambedkar, Uddhav Thackeray
Ncp News : राष्ट्रवादीला धक्का ! महाराष्ट्राबाहेरील एकमेव खासदाराला न्यायालयानं सुनावली 'ही' शिक्षा

उध्दव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात युती संदर्भात चर्चा सुरु आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरेंसोबत युती करणार असल्याचं जाहीर केल्यावर देखील ठाकरे गटाकडून याबाबतची भूमिका स्पष्ट करण्यात आली नव्हती. फक्त युती संदर्भात चर्चा सुरु असल्याचं सांगण्यात आलं होतं.

एकीकडं आंबेकर व ठाकरे युती चर्चेच्या फेर्यात अडकली असतानाच दुसरीकडं मुख्यमंत्री शिंदे यांनी आंबेडकरी चळवळीतील नेते जोगेंद्र कवाडे यांच्या पिपल्स रिपब्लिकन पार्टी या पक्षाशी युती देखील केली. मुख्यमंत्र्यांनी जलदगतीनं पावलं टाकत शिंदे गट- कवाडे गट युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. एकप्रकारे मुख्यमंत्री शिंदेंनी उध्दव ठाकरेंवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

आगामी काळात होणार्या मुंबई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यात शिंदे गटाकडून ठाकरे गटासह इतर पक्षांना धक्का देत नेते, पदाधिकार्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला जात आहे. यात आता आंबेडकरी चळवळीतील नेत्यांशी हातमिळवणी करत बहुजन मतांचं राजकीय समीकरण जुळविण्यात देखील सर्वच पक्षांचे प्रयत्न सुरु आहे.

त्यामुळेच ठाकरे गटानं आंबेडकर यांच्यासोबत युतीबाबत सकारात्मक पावलं उचलली होती. मात्र, महाविकास आघाडीत वंचितला सहभागी करुन घेण्यावरुन राष्ट्रवादी आणि कांग्रेसमध्ये मतमतांतरे आहेत. यामुळे ठाकरे आंबेडकर युतीच संभ्रम कायम आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com