आमदार नितीन देशमुखांना गुजरात पोलिसांकडून मारहाण ; संजय राऊतांचा दावा

पोलिस आणि गुंडांनी त्यांना मारहाण केल्याचा दावाही राऊतांनी केला.
आमदार नितीन देशमुखांना गुजरात पोलिसांकडून मारहाण ; संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut News, Maharashtra Political Crisis, Nitin Deshmukh Newssarkarnama

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे बंडखोर आमदार हे गुवाहाटी येथे पोहचले आहे. आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा शिंदेंनी केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी रात्री उशिरा टि्वट करीत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. (Nitin Deshmukh News in Marathi)

शिवसेनेच्या एका आमदाराचे मुंबईतून अपहरण केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. आमदाराने स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण गुजरात पोलिस आणि गुंडांनी त्यांना मारहाण केल्याचा दावाही त्यांनी केला. गुजरातमध्येही मुंबईचे गुंडे असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. (Maharashtra Political Crisis News)

संजय राऊत आपल्या टि्वटमध्ये म्हणतात,"“आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) हे सुरतमध्ये भाजपच्या ताब्यात आहेत. त्यांचे मुंबईतून अपहरण करण्यात आले होते. सोमवारी रात्री त्यांनी स्वत:ची सुटका करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गुजरात पोलिस आणि गुंडांनी त्यांच्यावर अमानुषपणे हल्ला केला. मुंबईचे गुंडही तेथे आहेत. गुजरातच्या भूमीवर हिंसाचार?”

सुरतहून गुवाहाटी येथे पोहोचलेले शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा केला आहे. बुधवारी सकाळी सर्व आमदार सुरतहून एका विमानाने गुवाहाटीला गेले आहेत. गुवाहाटीला जाण्यापूर्वी एकनाथ शिंदे म्हणाले, "माझ्यासोबत असलेल्या शिवसेनेच्या आमदारांना बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी हिंदुत्वाची शिकवण दिली आहे, ते हिंदुत्व आम्ही पुढे नेत आहोत,"

"एकनाथ शिंदे यांचे बंड हा घरातील विषय आहे. त्यांच्याशी संवाद सुरु असून आज सकाळी त्यांच्याशी एक तास चर्चा झाली. त्यांच्या कुठल्याही अटी, मागण्या नाहीत, त्यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे," असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आज माध्यमांना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in