घराणेशाहीचा आरोप हा फक्त राष्ट्रवादीवरच का?

पवारांच्या घराणेशाहीचा मुद्दा प्रकर्षाने प्रथमच चर्चिला गेला. कारण त्या आघाडीवर बारणेंची पाटी कोरी होती.
Pimpri-Chinchwad politics
Pimpri-Chinchwad politicssarkarnama

पिंपरी : घराणेशाही नसलेला पक्ष आज शोधूनही सापडणार नाही. शहरी आणि ग्रामीण असा दुहेरी बाज असलेले निमशहरी पिंपरी-चिंचवडचे (Pimpri-Chinchwad) राजकारण स्थानिक- बाहेरचा, गावकी- भावकी याभोवतीच फिरते आहे. आता त्यात घराणेशाहीची भर पडली आहे.

कुठलाच प्रमुख राजकीय पक्ष म्हणजे आजी माजी सत्ताधारी म्हणजे भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेसही त्याला अपवाद नाही. मात्र, घराणेशाहीचा आरोप हा फक्त राष्ट्रवादीवरच (ncp)होत आहे. त्याचा जोरदार फटका त्यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत बसलाही आहे.

गेल्या लोकसभेला २०१९ ला पार्थ पवार हे पिंपरी-चिंचवड शहरातील तीनपैकी चिंचवड आणि पिंपरी या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे तर, त्यांचे प्रतिस्पर्धी युतीचे (शिवसेना) श्रीरंग बारणे हे उमेदवार होते. त्यावेळी पवारांच्या घराणेशाहीचा मुद्दा प्रकर्षाने प्रथमच चर्चिला गेला. कारण त्या आघाडीवर बारणेंची पाटी कोरी होती.

Pimpri-Chinchwad politics
नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र ; केली ही विनंती

गावकी, भावकी व स्थानिक बाहेरचा असे राजकारण चालणाऱ्या उद्योगनगरीत हे दोन मुद्दे प्रचारात निर्णायकी ठरले. परिणामी प्रथमच पवार घराण्यातील व्यक्ती निवडणुकीत पराभूत झाली. घराणेशाही नकोला राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचीही सुप्त फूस त्यावेळी बारणेंना मिळाली होती.

दरम्यान, लोकसभेला घराणेशाहीला विरोध करीत तो प्रचाराचा मुद्दा केलेल्या बारणेंनी, मात्र आता स्वतच घराणेशाही सुरु केली आहे. त्यांचे चिरंजीव विश्वजीत यांना त्यांनी आपले राजकीय वारसदार म्हणून पुढे आणले आहे. आपल्यानंतर तोच आपला राजकीय वारसा पुढे चालवील, याची तजवीज केली आहे. त्यासाठी त्याची वर्णी प्रथम शिवसेनाप्रणित युवासेनेचे पिंपरी-चिंचवड अधिकारी तथा प्रमुख म्हणून लावली आहे.

Pimpri-Chinchwad politics
राऊतांचे मौन : मनसेचं टि्वट, आघाडी सरकार म्हणजे 'अमिताभ-जया-रेखा' यांचा 'सिलसिला'

त्यानंतर आता त्याला नगरसेवक म्हणून पाठविण्याची तयारी सुरु झाली आहे. घराणेशाही नाही म्हणणाऱ्या भाजपमध्येही ती शहरात सुरु झाली आहे. शहर कारभारी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप हे नगरसेवक होते. ते पुन्हा तयारीत आहेत.

पक्षाचे चिंचवड विधानसभा प्रभारीही तेच आहेत. २०२२ च्या नगरसेवकाची जोरदार तयारी त्यांनी सुरु केली आहे. २०२४ ला विधानसभा लढविण्याचाही त्यांचा मानस असल्याचे कळते. दुसरे शहर कारभारी भोसरीचे पैलवान आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन हे यावेळी पालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

भाजप, राष्ट्रवादीचे खासदार, आमदार, नगरसेवक यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनीही घराणेशाही सुरु केली आहे. अनेकांनी आपली पत्नी, पती, मुलगा, मुलगी, सुन अशाप्रकारे आपल्याच घरातील उमेदवार आगामी निवडणुकीत उतरविण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. यानंतर मग, घराणेशाही किंवा राजकीय वारसा केवळ पवार कुटुंबियांसाठीच लागू होत होता का वा होत आहे, असा प्रश्न पिंपरी-चिंचवडकरांना पडला आहे.

पार्थ पवारांना विरोध करणाऱ्या स्थानिक नेत्यांना आपला मुलगा, मुलगी, जावई, भाचा यांना आपला राजकीय वारसदार घोषित करण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा सवाल ते विचारू लागले आहेत. २० ते २५ वर्षे सभागृहात विविध पदांवर काम केल्यानंतर ज्येष्ठांनी घराणेशाही न चालवता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली, तर निष्ठावंतांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार आहे, हाच खरा प्रश्न आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com