Live Supreme Court Hearing on ShivSena: उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर....

Maharashtra Political Crisis: राज्याच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा निकाल सर्वोच्च न्यायालयात आज जाहीर होत आहे.
Supreme Court Hearing on ShivSena
Supreme Court Hearing on ShivSenaSarkarnama

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे राज्यपालांनी शिंदे-फडणवीस यांना बोलवलं. त्यांनी बहुमत सिद्ध केलं. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकार वाचलं. - अॅड. सिद्धार्थ शिंदे

१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवण्यात आला आहे. पण उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही सरकार स्थापन केलं असतं. पण न्यायालय ठाकरे यांचा राजीनामा नाकारु शकत नाही.

अविश्वास प्रस्ताव आला नसताना राज्यपाल बहुमताची चाचणीचा निर्णय़ घेऊ शकत नाही

१०व्या सुचीनुसार फुटीला कुठलाही युक्तीवाद नाही. फुटलेला गट पक्षावर दावा करु शकत नाही.

अपात्रतेपासून वाचण्यासाठी आम्हीच खरी शिवसेना आहोत हा शिंदे गटाचा दावा करता येऊ शकत नाही.

शिंदे गटाने भरत गोगावले यांची प्रतोद पदी नियुक्ती बेकायदेशीर. संसदीय पक्षाच्या नेत्याला व्हिपचा अधिकार नाही.

भगतसिंह कोश्यारी म्हणतात...

''निकाल येईपर्यंत त्यावर काही बोलणं मूर्खपणा ठरेल. आता या सगळ्यातली माझी भूमिका संपली आहे. आता न्यायालय माझ्या भूमिकेवर जे बोलेल, त्यावर आम्ही बोलू.''

घटनापीठ 

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड़, न्यायाधीश एम.आर. शाह, कृष्ण मुरारी, हिमा कोहली आणि पी.एस. नरसिंह या पाच न्यायाधिशांच्या घटनापीठासमोर सुनावणी झाली होती. आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड निकाल जाहीर करणार आहेत.

सत्तासंघर्षाचा निकाल 

राज्यातील ऐतिहासिक सत्तांतरानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. गेल्या ११ महिन्यांत सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर प्रदीर्घ सुनावणी पार पडली. शिंदे गट, उद्धव ठाकरे गट, माजी राज्यपाल यांच्या बाजूंच्या वकिलांनी युक्तीवाद केला. दोन महिन्यांपुर्वी १६ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात शेवटची सुनावणी पार पडली आणि न्यायालयाने निकाल राखून ठेवला. आज (११ मे) हा निकाल जाहीर होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com