Eknath Shinde : राऊतांची शिंदेंसोबत एक तास चर्चा ; शिवसेना अटींवर चालत नाही

"राखेतून जन्म घेण्याची ताकद शिवसेनेत आहे,"
eknath shinde, sanjay raut
eknath shinde, sanjay rautsarkarnama

मुंबई : "एकनाथ शिंदे यांचे बंड हा घरातील विषय आहे. त्यांच्याशी संवाद सुरु असून आज सकाळी त्यांच्याशी एक तास चर्चा झाली. त्यांच्या कुठल्याही अटी, मागण्या नाहीत, त्यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे," असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आज माध्यमांना सांगितले. (eknath shinde latest news)

"एकनाथ शिंदे (eknath shinde) हे शिवसेनेचे मोठे नेते असून ठाणे-कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुका या त्यांच्या आदेशानुसारच लढल्या जातात, शिवसेनेचे आमदार सध्या गुवाहाटी येथे असल्याची समजते. शिवसेनेच्या आमदारांनी देश पाहिला पाहिजे, ते सध्या आसामचे जंगल पाहायला गेले आहेत," असे राऊत म्हणाले.

"शिवसेना ही अटींवर चालत नाहीत," असे राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. "राखेतून जन्म घेण्याची ताकद शिवसेनेत आहे," असे राऊत म्हणाले.

"बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला हिंदुत्वाचा विचार केला त्यामुळे बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार आणि विकासाचा विचार घेऊनच आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत आम्ही शिवसेना सोडलेली नाही सोडणार नाही," अशा शब्दांमध्ये एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.

eknath shinde, sanjay raut
आबिटकर घाबरु नका, पुढे या ; बंडखोर आमदारांचा हॉटेलमध्ये संवाद

शिंदे यांचा राज्यपालांना भेटण्याचा तसेच भाजपला पाठिंबा देण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. "आम्ही गुवाहाटीत 40 पेक्षा जास्त आमदार आहोत. आम्ही शिवसेना सोडण्याचा तसेच इतर कुठल्याही पक्षात जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला नाही, फक्त आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व, त्यांची भूमिका पुढे घेऊ जात आहोत," असे शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले आहे. मात्र, शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना मोठा दणका देत त्यांना गटनेतेपदावरुन तात्काळ बाजूला केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com