मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना फोन, मनसेत विलीन होणार ?

महाविकास आघाडी मधून 39 शिवसेना आमदार बंड करून बाहेर पडले आहेत. त्यामुळे सरकार फूटीच्या उंबरठ्यावर आहे.
Raj Thackeray News, Eknath Shinde News, Maharashtra Political Crisis News
Raj Thackeray News, Eknath Shinde News, Maharashtra Political Crisis Newssarkarnama

मुंबई : राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवून देणारे नेते शिवसेनेचे (shiv sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे (eknath shinde) आपला आमदारांचा गट कायद्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी प्रक्रिया म्हणून कोणत्या तरी एका पक्षात विलीन करतील, अशी चर्चा आहे. याबाबतची कायदेशीर लढाई आज सुप्रीम कोर्ट मध्ये सुरू होणार आहे. (Eknath Shinde news update)

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना रंगला असताना शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) यांना फोन करून त्यांच्याशी राजकीय चर्चा केल्याचे वृत्त आहे. 'एएनआय'या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. महाविकास आघाडी मधून 39 शिवसेना आमदार बंड करून बाहेर पडले आहेत. त्यामुळे सरकार फूटीच्या उंबरठ्यावर आहे.(Maharashtra Political Crisis News)

एकनाथ शिंदे हे असा आपला गट राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये विलीन करण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे, शिंदे यांनी रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी राज ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत विचारणा केली. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील चर्चा केल्याची माहिती आहे. एका मनसेनेत्यांने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Raj Thackeray News, Eknath Shinde News, Maharashtra Political Crisis News
बंडखोरांमुळे राऊतांना झाली राणेंची आठवण ; राणेंच्या हिमतीचं केलं कौतुक, म्हणाले..

महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलेले अपक्ष आणि शिवसेना आमदारांचे बंड आता नव्या वळणावर आले आले. त्यांचा गट विलीन करायची वेळ आल्यास राजकीय पर्यायांची चाचपणी करताना त्यांच्याकडे मनसेचाही पर्याय आहे. सध्या मागील काही दिवसांत एकनाथ शिंदे-राज ठाकरे यांच्यात 2 वेळेस चर्चा झाली आहे. या चर्चेमध्ये एकनाथ शिंदेंनी राजकीय परिस्थिती आणि राज ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस केल्याचं सांगितलं जात आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत बंडखोर आमदारांवर तोफा डागत असताना दुसरीकडे शिवसेनेला मात्र त्यांच्या घरातूनच सुरुंग लागताना दिसत आहे.संजय राऊत यांचे धाकटे भाऊ आणि शिवसेनेचे आमदार सुनील राऊत हे देखील आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातून फुटून एकनाथ शिंदे गटाला मिळण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com