Devendra Fadnavis, sanjay raut
Devendra Fadnavis, sanjay rautsarkarnama

आमच्या झमेल्यात पडू नका, जे पहाटे झालं ते आता सायंकाळी होईल ; राऊतांचा सल्ला

तुम्ही या फंदात पडू नका, जे पहाटे झालं ना ते आता सायंकाळी होईल, भाजपची उरलीसुरली प्रतिष्ठा ते यात गमावून बसतील.

मुंबई : विरोधीपक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे विशेष विमानाने शुक्रवारी रात्री दिल्लीला गेले होते. रात्री पक्षश्रेष्ठी जे. पी. नड्डा यांच्यासोबत त्यांनी चर्चा केल्याची माहिती आहे. त्यानंतर विशेष विमानाने देवेंद्र फडणवीस आज पहाटे पुन्हा मुंबईत परतले आहेत. भाजप महाराष्ट्रात सत्तास्थापन करण्याच्या हालचाली करीत असल्याची चर्चा आहे.(sanjay raut news update)

फडणवीस सरकार स्थापनेची रणनीती आखत असल्याची चर्चा आहे. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी फडणवीसांना सल्ला दिला. फडणवीस यांनी पहाटे घेतलेल्या शपथविधीची आठवण करुन दिली. राऊत माध्यमांशी बोलत होते. "राज्यात सुरु असलेल्या सध्याच्या परिस्थिती फडणवीसांनी पडू नये," असे राऊत म्हणाले.

राऊत म्हणाले, "राज्यात सुरु असलेल्या झमेल्यात फडणवीसांनी पडू नये, त्यांच्या नेतृत्वाला धक्का बसेल. आमच्यात राजकीय मतभेद असले तरी मला त्यांच्याविषयी आदर, प्रेम आहे. फडणवीसांनी त्यांची प्रतिष्ठा जपावी.आमच्यात पडू नये,"

Devendra Fadnavis, sanjay raut
शिंदेंकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु ; प्रवक्तेपदी गोगावले, बच्चू कडू यांची नियुक्ती

"तुम्ही या फंदात पडू नका, जे पहाटे झालं ना ते आता सायंकाळी होईल, भाजपची उरलीसुरली प्रतिष्ठा ते यात गमावून बसतील. आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्ही मध्ये पडू नका, असा सल्ला राऊतांनी फडणवीसांनी दिला आहे.

फडणवीसांचा सागर बंगला सध्या गोपनीय हालचालींचं केंद्र बिंदु ठरला आहे. आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना सोबत फडणवीस सागर बंगल्यावर सत्तास्थापनेसाठी रणनीती आखत असल्याची चर्चा आहे. मलबार हिलवर समुद्राला लागून फडणवीस यांचा सागर हा बंगला सध्या गोपनीय हालचालींचे केंद्र बनला आहे. पण कुठेही त्याची वाच्यता न करण्याचे भान भाजपने बाळगले आहे.

सत्तेची स्क्रिप्ट ते लिहीत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरणारे फडणवीस सध्या राज्यातील परिस्थितीबाबत मौन बाळगून आहेत. ते शांत कसे असा प्रश्न विचारला जात असून ते काहीतरी रणनीती आखत असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com