प्रभुंना प्रतोद ठेवणं चुकीचं, सेनेच्या याचिकेला आता अर्थ राहिला नाही ; केसरकरांचं स्पष्टीकरण

विधीमंडळाला अनेक दिवस अध्यक्ष नव्हते, ही बाब योग्य नव्हती. आता अध्यक्षांची निवड झाली असून सर्वांना त्यांचे आदेश मानावे लागतील," असे केसरकर यांनी सांगितलं.
Deepak Kesarkar
Deepak Kesarkarsarkarnama

मुंबई : शिवसेनेतून (shivsena) बंड केलेल्या १६ आमदारांना न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशिवाय आमदारांवर कोणतीही कारवाई करु नये, अशी सूचना सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी विधानसभा अध्यक्षांना केली आहे. सरन्यायाधीशांच्या या निर्णयामुळे शिंदे गटातील बंडखोर आमदारांना एका प्रकारे दिलासाच मिळाला आहे.

एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak kesarkar) यांनी या निकालावर भाष्य केलं आहे. "शिवसेनेने दाखल केलेल्या मुद्द्यांना आता काही अर्थ राहिला नाही," असे केसरकर म्हणाले. "जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत निलंबन नाही हे योग्य आहे. कारण सर्व बाजू जाणून घेणे गरजेचे आहे. सुनील प्रभु यांना प्रतोद म्हणून ठेवले हे चुकीचं आहे," असे केसरकरांनी स्पष्ट केलं.

"शिंदे यांना गटनेतेपदावरुन दूर करण्यासंबंधी सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली होती. ती आता जवळपास निकालात लागली आहे. सेनेच्या याचिकेतल्या मुद्द्यांना आता अर्थ नाही. विधीमंडळाला अनेक दिवस अध्यक्ष नव्हते, ही बाब योग्य नव्हती. आता अध्यक्षांची निवड झाली असून सर्वांना त्यांचे आदेश मानावे लागतील," असे केसरकर यांनी सांगितलं.

Deepak Kesarkar
अबू सालेमच्या सुटकेबाबत सुप्रीम कोर्टानं दिला हा निकाल

शिवसेनेचे खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे खासदार सामील होणार आहेत, अशी चर्चा आहे. याबाबत केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले की खासदार संपर्कात असणे किंवा नसणे फार महत्वाचे नाही. पण त्यांची भूमिका हीच आहे कि भाजप आणि शिवसेना ने एकत्र यावे,"

बाळासाहेबांचा अजेंडा ..

"राज्यात आता शिंदे सरकारचा कारभार सुरळीत चालला आहे. आम्ही अजूनही शिवसेनेचे सदस्य आहोत. आम्ही वचन पळाले नाही, असं पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना वाटत असलं तरी बाळासाहेबांचा अजेंडा आम्ही राबवित आहोत. सध्या हे जे काही प्रकार चालले आहेत ते फार बरोबर नाहीत,"

राऊतांची ठाकरेंवर नव्हे पवारांवर निष्ठा

"शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे शरद पवार साहेबांचे जास्त जवळचे आहेत. त्यांनी स्वतः च्या मनाला विचारावं कि उद्धव साहेबांवर किती निष्ठा आहे आणि पवार साहेबांवर किती निष्ठा आहे," असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in