उद्धव ठाकरे -एकनाथ शिंदे भेटणार ; भाजपला धन्यवाद, शिवसेना नेत्याच्या टि्वटमुळे खळबळ

भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद, चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल.
eknath shinde, uddhav thackeray
eknath shinde, uddhav thackeraysarkarnama

मुंबई : शिवसेनापक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) एकमेकांना भेटणार असल्याबाबतचे टि्वट शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (deepali sayed) यांनी केलं आहे. या टि्वटमुळे चर्चांना उधाण आलं आहे. "येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार?" असं टि्वट करुन दिपाली सय्यद यांनी खळबळ उडवून दिली आहे. (deepali sayed news update)

"येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरं वाटलं. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखांची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहेत. या मध्यस्थीकरीता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद, चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल," असे सय्यद यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.या टि्वटसोबत त्यांनी आणखी एक टि्वट केलं आहे.

"लवकरच आदित्य ठाकरे मंत्रीमंडळात दिसावेत, शिवसेनेच्या 50 आमदारांनी मातोश्रीवर दिसावे, आदरणीय उद्धव साहेब व आदरणीय शिंदेसाहेब एक व्हावे, शिवसेना हा गट नसुन हिंदुत्वाचा गड आहे, त्यावरचा भगवा नेहमी डौलाने फडकत राहील, असं दिपाली सय्यद यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

eknath shinde, uddhav thackeray
गणपतराव देशमुखांच्या कार्याची सरकारकडून दखल ; विधानसभेचे स्मृतिपत्र प्रदान

दिपाली सय्यद यांनी यापूर्वीही टि्वट करीत ठाकरे-शिंदे यांच्या भेटीसाठी भाजने मध्यस्थी करावी,अशी विनंती केली होती. "उद्धवसाहेबांनी आमदारांसाठी मातोश्रीचे दरवाजे नेहमीच उघडे ठेवले असून एकनाथ शिंदे यांच्यावतीने प्रवक्ते आणि आमदारांनी उद्धव साहेबांशी चर्चा करण्याची विनंती केली आहे. ही सर्व घटना शिवसेनेचा भाजपावर असलेल्या हिंदुत्वाच्या विश्वासामुळे घडली असून भाजपाने मोठ्या मनाने मध्यस्थी करावी," असं सय्यद म्हणाल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com