पोलीस बदल्यांवरुन शिवसेनेचे नाराजी नाट्य ; पदोन्नती थांबवण्याची गृहखात्यावर नामुष्की

१२ तास उलटत नाही तोच ५ अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे.
Eknath Shinde , Dilip Walse Patil
Eknath Shinde , Dilip Walse Patilsarkarnama

मुंबई : मुंबई आणि ठाण्यातील बदल्याबाबत सबंधित पालकमंत्र्यांना विश्वासात न घेतल्याने पदोन्नती थांबवण्याची गृहखात्यावर नामुष्की आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. महाराष्ट्र पोलिस दलात (maharashtra police) काल (बुधवारी) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले होते. त्याला १२ तास उलटत नाही तोच ५ अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस बदल्याबाबत महाविकास आघाडीत नाराजी नाट्य रंगले आहे.

आज सकाळी मुंबई आणि ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त अशा पाच जणांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती दिली होती.

बुधवारी हे परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. ठाण्यात पदोन्नती बाबत शिवसेनेचे (Shivsena) नेते, राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना विश्वासात घेतले नसल्याची चर्चा आहे. याआधी अनिल देशमुख गृहमंत्री असताना मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या (DCP) बदल्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर त्या बदल्या स्थगित केल्या होत्या. असाच प्रकार सध्या घडल्याचे बोललं जाते.

Eknath Shinde , Dilip Walse Patil
बारा तासांतच ५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती ; गृहविभागाचा अजब कारभार

राज्यातील वादग्रस्त आयपीएस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केली होती.काल रात्री गृह खात्याने पदोन्नतीच्या आदेश काढले होते.आज सकाळी मुंबई आणि ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त अशा पाच जणांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती दिली होती. बुधवारी हे परिपत्रक जारी करण्यात आलं होतं.

पंजाबराव उगले, राजेंद्र माने, संजय जाधव, दत्तात्रय शिंदे या अधिकाऱ्यांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती. या आदेशाला गृहविभागाकडून स्थगिती देण्यात आली आहे. वादग्रस्त आयपीएस अधिकाऱ्यांची बदली केली होती. यात नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचाही समावेश होता.

Eknath Shinde , Dilip Walse Patil
मोठी बातमी : धनंजय मुंडेंना महिलेची धमकी ; बलात्काराची तक्रार दाखल करणार

त्यांच्या जागी नाशिमध्ये जयंत नाईकनवरे कारभार सांभाळणार होते. तर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांचीही बदली झाली होती. त्यांच्या जागी अंकुश शिंदे यांची नियुक्ती झाली होती. बीडचे पोलीस अधिक्षक आर. राजा यांची पुण्यात बदली करण्यात आली होती. पुण्यातील मावळ गोळीबार प्रकरणामुळे वादग्रस्त कारकीर्द राहिलेल्या संदीप कर्णिक यांचं पुण्यात पुनरागमन झालं होतं.

पुण्याचे सहपोलीस आयुक्त म्हणून त्यांच्याकडे कारभार सोपवण्यात आला होता. मिलींद भारंबे यांना पदोन्नती देण्यात आली होती. भारंबे कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून काम पाहणार होते. मात्र, कालच्या या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com