Maharashtra News : राज्यपाल कोश्यारी कोणत्याही क्षणी पायउतार : अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?

Maharashtra News : सिंगांना महाराष्ट्रात पाठवून पंजाबमध्ये राजकीय फायद्याचं भाजपचं गणित!
Maharashtra News : BhagatSingh koshyari
Maharashtra News : BhagatSingh koshyariSarkarnama

Maharashtra News : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (BhagatSingh koshyari) यांनी नुकतंच पंतप्रधान मोदींकडे राज्यपाल पदाचा राजीनामा दिला व आपल्याला पदमुक्त करण्यात यावे,अशी इच्छा व्यक्त केली. यानंतर आता जर कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला तर पुढचे राज्यपाल कोण याबाबत चर्चा सुरू झाली आहे. यातच आता पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची राज्यपालपदी नियुक्ती होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे. मात्र याची पुष्टी कुणाकडूनही झालेली नाही. भाजपनेही यावर मौन बाळगले आहे.

महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मोदींच्या मुंबई दौऱ्यात, त्यांच्याकडे राजीनामा दिल्याची बातमी आली होती. यामुळे आता पदावरून दूर सारून विश्रांतीसाठी पाठवण्याची शक्यता आहे.

Maharashtra News : BhagatSingh koshyari
Ramdev Baba : पेट्रोलनंतर रामदेव बाबांची नवी भविष्यवाणी; म्हणाले "पाकिस्तानचे..."

अमरिंदर सिंग काँग्रेसचे माजी नेते व पंजाबचे माजी मुख्यमंत्री :

कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्रीपदी राहिलेले आहेत. ते पंजाब काँग्रेसचे माजी राज्य अध्यक्षही होते. सिंग यांचे वडील पटियाला राज्याचे शेवटचे राजे होते. सिंग यांनी 1963 ते 1966 या कालावधीत भारतीय लष्करातही सेवा दिली. मोदी लाट असतानाही 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अमृतसर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी विजय खेचून आणला होता.

Maharashtra News : BhagatSingh koshyari
Pathan Movie : पठाणसमोर बॉयकॉट अस्त्र फेल : कमाईचे सगळे विक्रम मोडत बॉक्स-ऑफिसवर दादागिरी!

काँग्रेसमधील पक्षांतर्गत मतभेद व वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या वादावादीमुळे अमरिंदर यांना 18 सप्टेंबर 2021 ला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी पंजाब लोक काँग्रेस (पीएलसी) नावाने स्वत:चा राजकीय पक्ष काढला. यानंतर मात्र त्यांनी आपला पक्ष भाजपत विलीन केला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com