Eknath Shinde | Devendra Fadnavis
Eknath Shinde | Devendra FadnavisSarkarnana

शिंदे सरकारचे ‘मविआ’ला धक्के; मंत्रिमंडळाच्या एकाच बैठकीत बदलले ४ निर्णय

Eknath Shinde | Devendra Fadnavis | BJP-Shivsena : शिंदे सरकारची लोकप्रिय घोषणांची मालिका सुरुच

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (chief Minister Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील सरकारने महाविकास आघाडीला धक्क्यांवर धक्के देणे सुरुच ठेवले आहे. शिंदे सरकारने ठाकरे सरकारच्या काळातील निर्णय बदलण्याचा आणि फडणवीस सरकारच्या (Devendra Fadanvis) काळातील योजनांचे पुनरुज्जीवन करण्याच्या धडाका लावला आहे.

आजच्या एकाच कॅबिनेट बैठकीत शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या काळातील ४ निर्णय बदलले आहेत. यात ग्रामपंचायतींमधील सरपंच आणि नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवड थेट जनतेमधून होणार आहे. शिवाय पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट देखील कमी करण्यात आला आहे. नव्या सरकारने पेट्रोलवरील ५ रुपये आणि डिझेलवरील व्हॅट ३ रुपये कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासोबतच १९७५ सालच्या आणीबाणी कालावधीत ज्या व्यक्तींना तुरुंगवास सोसावा लागला, अशा व्यक्तींच्या सन्मानार्थ देण्यात येणारी पेन्शन योजना देखील पुन्हा लागू करण्यात आली आहे. ठाकरे सरकारने सत्तेत आल्यानंतर ही पेन्शन योजना बंद केली होती. काँग्रेसच्या दबावाखाली हा निर्णय घेताला असल्याचे आरोप त्य़ावेळी झाले होते.

मंत्रिमंडळ बैठकीत आज घेण्यात आलेले निर्णय :

  • पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अनुदानातून वगळणार नाही.

  • आणीबाणी कालावधीत तुरुंगवास सोसावा लागलेल्या व्यक्तींच्या सन्मानार्थ देण्यात येणारी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यात येणार.

  • ग्रामपंचायतींमधील सरपंच आणि नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवड थेट जनतेमधून होणार.

  • पेट्रोलवरील ५ रुपये आणि डिझेलवरील ३ रुपये व्हॅट कमी करण्यात येणार.

  • स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान" राबविण्यात येणार.

  • केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान २.० राबविण्यात येणार.

  • बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार मिळणार.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in