Maharashtra Legislative Council : विरोधीपक्षनेत्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादीत चुरस

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेनं दावा केल्याचे समजते.
Maharashtra Legislative Council
Maharashtra Legislative Council sarkarnama

मुंबई :राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिंदे सरकार (Eknath Shinde) स्थापन झाले. त्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली. आता विधानपरिषदेतील (Maharashtra Legislative Council) विरोधीपक्षनेता कोण कोणार याकडे सगळ्याचे लक्ष लागलं आहे. (Maharashtra Legislative Council news update)

शिवसेना, राष्ट्रवादीचा या पदावर डोळा असल्याने या पदी कोण विराजमान होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे अजित पवार यांची वर्णी लागल्याने विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेनं दावा केल्याचे समजते.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी शिवसेना विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी अध्यक्षांकडे नाव पाठवणार आहे. विधान परिषदेत ७८ सदस्य आहेत. यामध्ये शिवसेनेचे १३ सदस्य आहेत. "आमचे सदस्य जास्त असल्याने विरोधी पक्षनेते पद आम्हाला द्या," अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

Maharashtra Legislative Council
उद्वव ठाकरेचं शिवसेना आमदारांना भावनिक पत्र..

नव्या सरकारला सामोरे जाण्यासाठी हा पक्षाचा एकमेव आवाज असेल, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. राष्ट्रवादी देखील या पदासाठी इच्छुक असल्याचे शिवसेनेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. तर दुसरीकडे, "भाजपशी लढण्यासाठी एकनाथ खडसेंसारखे अनुभवी नेते आहेत," असं राष्ट्रवादी कॉग्रेसनं म्हणणं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 बंडखोर आमदारांची आमदारकी जाणार की राहणार याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे. या 16 बंडखोरांच्याआमदारकीवर गदा आली तरी शिंदे-फडणवीस सरकारला मात्र एवढा धोका नसल्याचं चित्र आहे.

आज महाराष्ट्रातील सत्तांतराबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीबाबत अनिश्चितता असल्याचं बोललं जात आहे. सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी शिवसेनेचे वकील आज कोर्टात विनंती करणार असल्याची माहिती आहे. या सुनावणीवर शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com