आमदार किशोर जोरगेवार, गीता जैन गुवाहटीला पोहचले : ठाकरेंसाठी उद्या तब्बल ८ धक्के तयार!

Shivsena | MLA | Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या पाठिशी तब्बल ४५ आमदार
Geeta Jain News, Kishor Jorgewar News, Uddhav Thackeray News, Political Crisis in Maharashtra
Geeta Jain News, Kishor Jorgewar News, Uddhav Thackeray News, Political Crisis in MaharashtraSarkarnama

मुंबई : काँग्रेसचे सहयोगी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार आणि गीता जैन या देखील आता गुवाहटीमध्ये दाखल झाले आहेत. याशिवाय कृषीमंत्री दादा भुसे आणि आमदार संजय राठोड हे देखील आज संध्याकाळी गुवाहटीमध्ये पोहचले. या सर्वांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. आता पर्यंत शिंदे यांना शिवसेनेच्या तब्बल ३७ आमदारांचे समर्थन मिळाले असून ८ इतर आमदार देखील त्यांच्यासोबत आहेत. त्यामुळे शिंदे यांना एकूण ४५ आमदारांचे समर्थन मिळाले आहे. (Political Crisis in Maharashtra)

दरम्यान ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, शिवसेनेचे आणखी ३ आमदार आणि ५ अपक्ष आमदार शिंदे यांच्या गोटात सामिल होण्यासाठी आज रात्री सुरतला पोहचणार आहेत. तिथून ते गुवाहटीला रवाना होण्याची शक्यता आहे. हे आमदार नक्की कोण आहेत, त्यांची नावं अद्याप समजू शकलेली नाहीत. मात्र त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनानंतरही त्यांना उद्या तब्बल ८ धक्के बसण्याची शक्यता आहे. शिवेसेच्या गोटात सध्या १८ आमदार आहेत. (Uddhav Thackeray News)

शिंदे यांना भाजपचा पाठिंबा :

दरम्यान, एका राष्ट्रीय पक्षाचा आपल्याला पाठींबा असल्याचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज आमदारांना सांगत आपले पत्ते ओपन केले आहेत. बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची एकमताने गटनेतेपदी निवड केली. त्यानंतर आमदरांशी बोलताना त्यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे. आपल्याला कुठेही काहीही कमी पडणार नाही, असे शिंदे यांनी आमदारांना सांगितल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ते पुढे म्हणाले, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, कुठेही काही लागले तरी कमी पडणार नाही, असा शब्द राष्ट्रीय पक्षाने दिला आहे. आता फक्त एकजुटीने राहयचे. आपले सगळ्यांचे सुख, दु:ख सारखेच आहे. विजय आपलाच आहे, असे शिंदे म्हणाले. तो पक्ष महाशक्ती आहे. पाकिस्तानला त्यांनी धडा शिकवला आहे, असेही शिंदे यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com