`माझ्या तीनही बहिणी खंबीर... त्यामुळे आम्हाला भीती वाटत नाही!`

लखीमपुरची घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. सत्ता कुणाचीही असली तरी अशा घटनांचा निषेधच‌ केला पाहिजे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
`माझ्या तीनही बहिणी खंबीर... त्यामुळे आम्हाला भीती वाटत नाही!`
Supriya Sulefacebook

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या कंपन्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या असून यावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, जिजाऊ, सावित्रीमाईंच्या मातीत माझ्या बहिणी जन्माला आलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला याची भीती वाटत नाही. केंद्र सरकार आणि दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र कधीही झुकलेला नाही आणि झुकणारही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपतींचे नाव भाषणात घेणारे दिल्लीतील नेते हे छत्रपतींच्या विचारांकडे दुर्लक्ष करतायत. छत्रपतींनी कधी महिलांना टार्गेट केले नाही. मात्र, मुघलांनी महिलांवर अत्याचार केले होते, याची आठवण खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना करुन दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या कंपन्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या असून यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी काल जेव्हा आमच्या बहिणींवर आयकर विभागाने धाड टाकल्याबद्दल कळलं तेव्हा धक्का बसला. ही दुर्दैवी गोष्ट आहे असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya Sule
सन्मानाची वागणूक मिळाली नाही तर महापालिकेत स्वबळावर! पवारांचा इशारा

दादा, मी पवार साहेब आम्ही राजकारणात आहोत, आमच्यावर आरोप होतात, त्याची आम्हाला सवय आहे. मला माझ्या बहिणींच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. त्या महाराष्ट्राच्या लेकी आहेत. या तीनही बहिणी खंबीर आहेत‌, त्या यातून बाहेर पडतील. जिजाऊ, सावित्रीमाईंच्या मातीत माझ्या बहिणी जन्माला आलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला याची भीती वाटत नाही, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी खंबीर साथ दिली आहे. दादाला थोडे वाईट वाटले, पण त्याला मी सांगितले तुझ्या बहिणी धीट आहेत, असे सांगितले.

Supriya Sule
सुधा मूर्तींमधली आई दिसते : उद्धव ठाकरे

केंद्र सरकार आणि दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र कधीही झुकलेला नाही आणि झुकणारही नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले आहे. लखीमपुरची घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. सत्ता कुणाचीही असली तरी अशा घटनांचा निषेधच‌ केला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

Related Stories

No stories found.