नितेश राणेंना मोठा दिलासा; ठाकरे सरकारनं उच्च न्यायालयात दिली हमी

नितेश राणेंच्या जामीन अर्जावर मंगळवारी न्यायालयात सुनावणी झाली.
Nitesh Rane

Nitesh Rane

sarkarnama

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली आहे. मंगळवारी त्यावर सुनावणी झाली असून न्यायालयाने राणेंना मोठा दिलासा दिला आहे.

अज्ञातवासात असलेल्या नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात मागील आठवड्यात सुनावणी झाली होती. यानंतर सत्र न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सलग तीन दिवस सुनावणी सुरू होती. राणेंचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळल्याने त्यांना अटक होणार हे स्पष्ट झाले होते. अटक टाळण्यासाठी राणेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

<div class="paragraphs"><p>Nitesh Rane</p></div>
सहकार विभागाच्या कारवाईआधीच दरेकरांनी दिला पदाचा राजीनामा

मंगळवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी राणे यांचे वकील नितीश प्रधान यांनी राणे हे आमदार असल्याने याचिकेवरील सुनावणी सुरू असेपर्यंत कठोर कारवाईपासू संरक्षण मिळावे, अशी मागणी केली. त्यावर राज्य सरकारकडूनही न्यायालयात राणेंना अटक न करण्याची ग्वाही देण्यात आली. आता या याचिकेवरील पुढील सुनावणी शुक्रवारी दुपारी अडीच वाजता होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत राणे यांना दिलासा मिळाला आहे.

सरकारी वकील सुदीप पासबोला यांनी न्यायालयात नितेश राणे हे हल्ल्यामागचे मुख्य सुत्रधार असल्याचा दावा केला. तसेच त्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल, असेही न्यायालयात सांगितले. न्यायालयाने सरकारलाही हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता सरकारकडून शुक्रवारी राणेंविरोधात कोणते पुरावे सादर केले जाणार, यावर राणेंचा जामीन अलंबून असणार आहे.

<div class="paragraphs"><p>Nitesh Rane</p></div>
निमित्त महापौर पदाच्या निवडणुकीचं; काँग्रेसला मिळणार नवा राजकीय भिडू

दरम्यान, सत्र न्यायालय राणेंच्या जामिनावर निर्णय देण्याआधीच पोलीस दलाने त्यांच्या अटकेची पूर्ण तयारी केली होती. मागील आठवड्यात पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. याचबरोबर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. पण, नितेश राणे सध्या नॉट रिचेबल आहेत. संतोष परब हल्ला प्रकरणात अटक होण्याच्या शक्यतेने ते गायब झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात शिवसेना-भाजपमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कणकवली पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरु असून पोलिसांची पथके गोव्यातही त्यांच्या शोध घेतला जात असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com