अजित पवारांनी पहिलीच मोठी घोषणा केली अन् सभागृहात संभाजी महाराजांचा जयघोष!

अजित पवार यांच्याकडून विधानसभेत आर्थिक वर्ष 2022-23 चा अर्थसंकल्प सादर केला जात आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून विधानसभेत आर्थिक वर्ष 2022-23 चा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरूवात करताच त्यांनी पहिलीच मोठी घोषणा केली. वढू बुद्रुक व तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) स्मारक उभारण्याची घोषणा पवारांनी केली. त्यासाठी 250 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. (Maharashtra Budget)

अजित पवार हे आज महाविकास आघाडीचा तिसरा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही सभागृहबात उपस्थित आहेत. अजित पवारांनी अध्यक्ष महोदय म्हणत थेट संभाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा केली. त्यामुळे सभागृहात संभाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. महाविकास आघाडीतील आमदारांनी जोरदार बाके वाजून या घोेषणेचे स्वागत केले. (Maharashtra Budget 2022)

अजित पवार म्हणाले, आज 11 मार्च. महाराष्ट्राची अस्मिता, स्फुर्तीस्थान, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा आज स्मृतिदिन. या दिनाचे औचित्य साधून त्यांच्या कार्यकतृत्वाला साजेसे असे त्यांचे स्मारक वढू बुद्रुक व तुळापूर ता. हवेली या परिसरात उभारण्याचे शासनाने ठरवले आहे. त्यासाठी शासनाकडून 250 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

संभाजी महारजांच्या नावाने शौर्य पुरस्कार

असामान्य शौर्य धाडस दाखवणाऱ्या राज्यातील नागरिकांसाठी येत्या वर्षापासून छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना सुरू करण्यात येत असल्याची घोषणाही अजित पवार यांनी केली. त्यानंतर महाराजांच्या स्फुर्तीदायी स्मृतींना अभिवादन करून तिसरा अर्थसंकल्प सादर करतो, असं म्हणत अजितदादांनी सुरूवात सुरूवात केली.

विकासाची पंचसुत्री

भारतीय तत्वज्ञानातील पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश पंचतत्वांप्रमाणेच विकासात अंतर्भूत असलेली आवश्यक असलेली पंचसुत्रीही आपण अंगीकारली पाहिजे. आरोग्य, दळणवळण, कृषी, उद्योग, मनुष्यबळ विकास या पाच सुत्रांनी झालेला विकास म्हणजेच विकास असतो. ही पंचसुत्रीच म्हणजे आपल्या यावर्षीच्या अर्थसंकल्पाचा पंचप्राण आहे, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com