घरात बसून घरातल्यांना अल्टीमेटम द्यावा! अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत अल्टीमेटम दिला होता. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
घरात बसून घरातल्यांना अल्टीमेटम द्यावा! अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं
Raj Thackeray News, Ajit Pawar News, Ajit Pawar on Raj Thackeray, loudspeaker controversySarkarnama

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत अल्टीमेटम दिला होता. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अल्टीमेटम देण्यासाठी ही हुकुमशाही नाही. घरात बसून घरातल्यांना अल्टीमेटम द्यावा. आम्हाला त्याचं काही देणंघेणं नाही, अशा शब्दांत पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. (Ajit Pawar on Raj Thackeray)

अजित पवार यांनी गुरूवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मागील काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, सध्या फारमोठ्या प्रमाणावर अल्टीमेटमवर चर्चा सुरू होती. महाराष्ट्रात (Maharashtra) अल्टीमेटमची भाषा कुणीही करू नये. कुठलंही सरकार कायद्याने, संविधानाने चालत असते. कुठल्याही राजकीय पक्षातील नेते, कार्यकर्त्यांनी असं वागणं बरं नाही. एखादा निर्णय घ्यायचा झाला तर सर्वांना बंधनकारक असेल. वेगवेगळ्या समाजाच्या सर्व धार्मिकस्थळांना हा नियम लागू होईल.

Raj Thackeray News, Ajit Pawar News, Ajit Pawar on Raj Thackeray, loudspeaker controversy
त्र्यंबकेश्वर, शिर्डीची काकड आरती बंद झाली; केवळ 20 मंदिरांकडे भोंग्याची परवानगी

लोकांच्या भावना भडकवून देणे, सोपं असतं. परंतु त्याची अंमलबजावणी करायची म्हटली तर सर्व धार्मिक स्थळांना नियम पाळावे लागतील. त्यांनी (राज ठाकरे) त्यांची भूमिका मांडली. औरंगाबादच्या सभेला परवानगी दिली होती, त्यात काही अटींचे उल्लंघन झाले. पोलीस यंत्रणा त्यांचं काम करेल. सरकार कुणालाही नाहक त्रास देणार नाही. पण कुणी कारण नसताना नियम मोडण्याचे प्रयत्न करू नये. ही हुकुमशाही नाही. अल्टीमेटम देऊ नये. घरात बसून घरातल्यांना अल्टीमेटम द्यावा. आम्हाला त्याचं काही देणंघेणं नाही. सरकार कायद्याने चालते. नियम सर्वांना सारखे आहेत, मग ते अजित पवार असो की सर्वसामान्य, असं पवारांनी स्पष्ट केलं.

ध्वनिप्रदुषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय 2005 चा आहे. रात्री दहा ते सकाळी सहा यावेळेत ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. राज्यात रमजान ईददिवशी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. कुठंही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घेतली होती. जहांगीरपुरी येथील जातीय दंगलीनंतर उत्तर प्रदेशात गोरखपूर येथील गोरख मठावरील भोंगे उतरवले. त्यानंतर अनेक मंदिरं व मस्जिदीवरील भोंगे उतरवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अनेकांनी स्वत;हून भोंगे उतरवले. त्याबाबत राज्य सरकारने आदेश काढला नव्हता, असंही अजित पवार यांनी सांगितले.

Raj Thackeray News, Ajit Pawar News, Ajit Pawar on Raj Thackeray, loudspeaker controversy
अडीच हजार संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण किमान पाच वर्षासाठी गेले!

राज्यात कुठल्याही परिस्थितीत कायदा-सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. लाऊडस्पीकरसाठी परवानगी घ्यावी. त्यामध्ये काहीही झालं तरी आवाजाची मर्यादा पाळावी. अजूनही काही मंदिरे, मस्जिदींमध्ये परवानगी घेणे बाकी असेल तर परवानगी घ्याव्यात. कुणाच्या दबावाला, भावनिक आवाहनाला बळी न पडता सर्वांनी सहकार्य करावे, असं आवाहनही पवारांनी केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.