Devendra Fadnavis : सेन्सिबल माणसाबद्दल विचारा..! राऊत अन् फडणवीसांमध्ये जुंपली

दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर टीकेचा बाण सोडला जात आहे.
Sanjay Raut Latest News, Devendra Fadnavis Marathi News
Sanjay Raut Latest News, Devendra Fadnavis Marathi NewsSarkarnama

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या चांगलीच जुंपली आहे. पनवेल येथील भाजपच्या (BJP) बैठकीत फडणवीसांनी राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर राऊतांनीही त्याला प्रत्युत्तर देत आमच्या लाऊडस्पीकरसमोर तुमच्या पिपाण्या टिकणार नाहीत, असं म्हटलं होतं. त्यावर फडणवीस यांनीही पलटवार केला. (Devendra Fadnavis Latest News)

फडणवीस रविवारी दिल्लीत आहेत. भाजपच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ते सहभागी झाले आहेत. त्याआधी माध्यमांशी बोलताना त्यांनी राऊतांवर निशाणा साधला. ते म्हणाले, संजय राऊतांना आता तरी समज यायला पाहिजे. त्यांनी पक्षाची काय अवस्था करून टाकलीय. तुम्ही मला त्यांच्याविषया का विचारता? सेन्सिबल माणसाविषयी विचारा, असा टोला फडणवीसांनी लगावला.

Sanjay Raut Latest News, Devendra Fadnavis Marathi News
Shiv Sena : शिवसेना, धनुष्यबाण शिंदेंकडे जाणार? माजी निवडणूक आयुक्तांनी थेटच सांगितलं...

विरोधकांचं काम टीका करणंच असतं. त्यांच्या असंवेदनशीलतेमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. आम्ही ती सुधारण्याचा प्रयत्न करतोय, असंही फडणवीस म्हणाले. दरम्यान, पनवेल येथील भाजपच्या बैठकीत फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल (शनिवारी) राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्याला राऊतांनी आज प्रत्युत्तर दिले.

"राज्यातील जनतेला संजय राऊतांनी वैताग आणला. शिवसेनेच्या जनतेला त्यांनी वैताग आणला. सगळ्यांना त्यांनी वैताग आणला. त्यामुळे सगळ्यांनी मिळवून ठरवलं की, हे 'लाऊडस्पीकर' बंद करायचं असेल तर सत्ता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही,"अशा शब्दात फडणवीसांनी काल राऊतांची खिल्ली उडवली होती.

Sanjay Raut Latest News, Devendra Fadnavis Marathi News
Shiv Sena : पालिका निवडणुकीत धनुष्यबाण दिसणार का? शिंदे अन् ठाकरेंसाठी धोक्याची घंटा

त्याला राऊतांनी आज उत्तर दिले. ते म्हणाले, "आमचा आवाज बुलंद आहे, तो घुमत राहणार. शिवसेनेच्या गर्जनेपुढे तुमचा टीकाव लागणार नाही, शिवसेनेचा लाऊडस्पीकर तुम्हाला बधीर केल्याशिवाय राहणार नाही, चोऱ्यामाऱ्या करुन हे सरकार आले आहे. हे सरकार फार काळ टीकणार नाही. हे सरकार मजबूत पायावर उभे नाही, आमचा लाऊडस्पीकर ५६ वर्षांपासून सुरु आहे, आमचा लाऊडस्पीकर हा महाराष्ट्राच्या जनतेचा बुलंद आवाज आहे आणि तो तसाच घुमत राहील"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in