Maharashtra Congress : पटोले - थोरात वादावर पडदा पडणार का ? ; "आज मुंबईत.."

Maharashtra Politics Congress h k patil News : थोरातांनी पक्षश्रेष्ठींकडे पटोलेंची तक्रार केली आहे.
Maharashtra Congress
Maharashtra Congress Sarkarnama

Maharashtra Politics Congress h k patil News : नाशिक पदवीधर विधान परिषदेत सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली अन् जिंकलीही, पण त्यामुळे काँग्रेसमधील (Maharashtra Congress) अंतर्गत धुसफूस बाहेर आली. नाराजीनाट्य समोर येत आहे, तर काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

सत्यजीत तांबेंचे मामा काँग्रेसचे नेते,माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधिमंडळ पक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याच्यासोबत काम करणं अशक्य असल्याचे सांगत थोरातानी पक्षश्रेष्ठींकडे पटोलेंची तक्रार केली आहे.

Maharashtra Congress
Shinde Govenment : पत्रकार वारीसेंच्या कुटुंबियांबाबत सरकारनं घेतला 'हा' निर्णय

पटोले-थोरात वादावर पडदा टाकण्यासाठी आज (रविवारी) सांयकाळी मुंबईत काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. आज ते थोरात यांची भेट घेणार आहेत. पटोले सध्या पुण्यात कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात आहेत.

एच.के.पाटील हे थोरातांची बाजू ऐकून घेणार आहेत, त्यानंतर ते पदाधिकारी, नेत्यांची म्हणणं ऐकणार आहेत, त्यानंतर पाटील हे याबाबतचा अहवाल हायकमांडला पाठविणारा आहेत. त्यामुळे पाटील-थोरात यांच्या भेटीत काय घडले, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

या बैठकीला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अनेक माजी मंत्री, ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत थोरात उल्लेख 'विधीमंडळ नेते'असा केल्याने काँग्रेसने थोरातांचा राजीनाम्यावर कोणताही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

एच.के.पाटील हे रविवारी आपल्या दौऱ्यात काँग्रेसच्या 'हाथ से हाथ जोडो' या मोहिमेचा आढावा घेणार आहेत. त्याआधी काँग्रेस विधीमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार आहेत. ही बैठक सांयकाळी सात वाजण्याच्या सुमारास होण्याची शक्यता आहे.

त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकारी प्रदेशाध्यक्षांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत 'हाथ से हाथ जोडो' या मोहिमेचा आढावा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये उद्भवलेल्या पेच प्रसंगानंतर पाटील प्रथमच मुंबईत दाखल होणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com