प्रतापगडींच्या उमेदवारीनंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पहिला राजीनामा; सोनिया गांधीवरही टीका

Imran Pratapgarhi | Congress : राज्यातील काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा
Congress party Latest Marathi News, Political News Updates in Marathi
Congress party Latest Marathi News, Political News Updates in MarathiSarkarnama

महाराष्ट्रातील ६ जागांवरील राज्यसभा निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. या ६ जागांसाठी ७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात शिवसेनेकडून संजय राऊत, संजय पवार, भाजपकडून पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसकडून इमरान प्रतापगढी यांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र काँग्रेस उमेदवार इमरान प्रतापगडी यांच्या उमेदवारीवरुन राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये कमालीची नाराजी असून ती नाराजी आता उफाळून आली आहे.

राज्यात अल्पसंख्याक समाजातील नेते महाराष्ट्रात असताना परराज्यातील नेत्याला संधी दिल्याने राज्यातील काँग्रेस (Congress) नेते नाराज असल्याची चर्चा मागील २ दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु होती. अखेरीस ही चर्चा खरी ठरली असून याच नाराजीतून काँग्रेसचे प्रदेश सचिव आशिष देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. महाराष्ट्रात कर्तबगार आणि काँग्रेसला चांगले नेतृत्व देऊ शकतील, असे नेते असतानाही बाहेरच्या नेत्याला उमेदवार म्हणून लादण्यात आले. त्यामुळे आपण नाराज असून राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Congress party Latest Marathi News, Political News Updates in Marathi
राणेंची जीभ पुन्हा घसरली; मुख्यमंत्र्यांवर खालच्या भाषेत अन् शिव्यांची लाखोली वाहत टीका

मात्र पदाचा राजीनामा दिल्यानंतरही आपण काँग्रेसमध्ये कायम राहणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले आहे.

Congress party Latest Marathi News, Political News Updates in Marathi
प्रफुल्ल पटेल तब्बल ४१६ कोटी रुपयांचे मालक पण नावावर एकही गाडी नाही!

याशिवाय सोनिया गांधी यांच्यावर टीका करताना देशमुख म्हणाले, राज्यसभेसाठी मला प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन खुद्द सोनिया गांधी यांनी दिले होते. मात्र, आता इम्रान प्रतापगढी यांचा निर्णय लादताना सोनिया गांधी यांच्यावर अन्य कोणाचा दबाव होता का, असा प्रश्न देशमुखांनी उपस्थित केला आहे. या दबावाखाली अनेक निर्णय चुकत आहेत. त्यामुळे पक्षाची हानी होत आहे, असेही देशमुख म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in