उस्मानाबादचं धाराशिव, तर औरंगाबादच्या नामांतरात एक बदल ; शिंदे सरकारचा निर्णय

विकासकामांसाठी ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यात मान्यता
maharashtra cabinet meeting
maharashtra cabinet meetingsarkarnama

मुंबई : शिंदे सरकारची आज तिसरी मंत्रीमंडळ बैठक झाली. यात महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या तीन निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील असं नामांतर करण्यात आल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी केली. (maharashtra cabinet meeting)

नामांतराबाबत विधीमंडळात ठराव करुन त्याचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारला पाठवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली."कायदेशीर पेच निर्माण होऊ नये म्हणून ठाकरे सरकारनं घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिली होती," असे ते म्हणाले.

६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यात मान्यता

"कोणत्याही प्रकल्पाचे काम रखडणार नाही, यासाठी कर्ज उभारण्यात येणार आहेत. विकासकामांसाठी ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यात मान्यता देण्यात आली आहे, असे शिंदे यांनी सांगितले. "मंत्रिमंडळ लवकरच होईल. मंत्रीमंडळ नसलं तरी कोणतेही निर्णय थांबलेले नाहीत. पालकमंत्र्यांची नियुक्ती लवकर करण्यात येईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केलं.

maharashtra cabinet meeting
राज्यात "एक दुजे के लिए" हा नवीन सिनेमा सुरु; बंडखोरांनी राजकीय आत्महत्या केलीयं!

विरोधकांची लाईन 'डेड' झाली आहे..

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. "विरोधकांची लाईन 'डेड' झाली आहे म्हणून त्यांना 'डेटलाईन' हवी आहे," असा टोमणा फडणवीस यांनी यावेळी विरोधकांना लगावला.

आजच्या पत्रकार परिषदेत दोन माईक

"आजच्या पत्रकार परिषदेत दोन माईक आहेत," असे देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीला सांगितले, त्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या हातातील माईक फडणवीसांनी ओढला, अशी टीका करण्यात आली होती. त्याला फडणवीसांनी खोचकपणे उत्तर दिले.

"शिंदे सरकारचं (Eknath Shinde) बेकायदेशीर आहे. इतके दिवस होऊन सुद्धा मंत्रिमंडळ शपथविधी घेऊ शकत नाही, एक मुख्यमंत्री एक उपमुख्यमंत्री 'एक दुजे के लिए',राजकारणात 'एक दुजे के लिए' हा नवीन सिनेमा सुरु आहे.या चित्रपटाचा शेवट काय झाला हे आपल्याला माहित आहे," अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडलं. ते आज माध्यमांशी बोलत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com