Cabinet Expansion : आज मुहूर्त मंत्रिमंडळ विस्ताराचा

Maharashtra Cabinet Expansion| शिंदे गटाचे नऊ आणि भाजपचे 9 मंत्री घेणार मंत्रिपदाची शपथ
Maharashtra Cabinet Expansion|
Maharashtra Cabinet Expansion|

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारचा अखेर आज (९ ऑगस्ट) मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होत आहे. आज सकाळी स. ११ वा. राजभवनातील दरबार हॉलमध्ये हा मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याचे थेटप्रसारण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ट्विटर, फेसबुक आणि युट्यूब या समाजमाध्यमांवर पाहता येईल.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी शिंदे गटाचे आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. तसेच, भाजपचे मंत्रीही मुंबईत दाखल झाले आहेत. शिंदे गट आणि भाजपचे मिळून एकूण 18 मंत्री आज शपथ घेणार असल्याची माहिती आहे. शिंदे गटाचे नऊ आणि भाजपचे 9 मंत्र्यांचा आज शपथविधी होईल. भाजपकडून एक महिलाही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्या महिला मंत्र्यांचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

Maharashtra Cabinet Expansion|
Shinde Cabinet : सामंत, गुलाबराव, भुसे, भुमरे, कडू फिक्स

शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री होणं हा मोठा आश्चर्याचा धक्का होता. मात्र शिंदे-फडणवीसांनी शपथ एक महिना उलटूनही राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होत नव्हता. त्यामुळे विरोधकांसह सामान्य जनता देखील सरकारवर टीका करु लागली होती.

या मधल्या काळात राज्यभरात पावसानं हाहाकार माजवला. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. फक्त शिंदे आणि फडणवीस या दोघांचंच मंत्रिमंडळ असल्यानं दोघांनीही काही ठिकाणी दौरेही केले. मात्र जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्यानं आणि राज्यात मंत्रिमंडळ नसल्यानं म्हणावं तसं लक्ष दिलं गेलं नाही, त्यानंतर अखेर आज मंत्रिमंडळ विस्तार होत आहे.

Maharashtra Cabinet Expansion|
शिंदे सरकारचा उद्या शपथविधी; मात्र, पंकजा मुंडेंना फोन नाहीच

शिंदे गटातून हे आमदार घेऊ शकतात मंत्रिपदाची शपथ
- दादा भुसे (Dada Bhuse)

- संजय शिरसाट (Sanjay Sirsat)

- उदय सामंत (Uday Sawant)

- भरत गोगावले (Bharat Gogawale)

- शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)

- संदिपान भुमरे (sandipan Bhumare)

- गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)

भाजपकडून हे आमदार घेऊ शकतात मंत्रिपदाची शपथ

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)

-सुधीर मुनंगटीवार (Sudhir Mungantiwar)

- गिरीश महाजन (Girish Mahajan)

- राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)

- सुरेश खाडे (Suresh Khade)

- रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan)

- विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit)

- अतुल सावे (Atul Save)

- मंगल प्रभात लोढा (MangalPrabhat Lodha)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com