Maharashtra Budget : व्हीपवरुन अधिवेशन गाजणार ; ठाकरे गटाने शिवसेनेला दिला 'हा' इशारा

Maharashtra Budget Session 2023 Live : हा व्हिप आम्हाला मिळालाच नाही, असे ठाकरे गटाच्या आमदारांनी सांगितले.
Eknath Shinde - Devendra Fadnavis - Ajit Pawar
Eknath Shinde - Devendra Fadnavis - Ajit PawarSarkarnama

Budget Session 2023 : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून (सोमवार) सुरूवात झाली आहे. राज्यपाल रमेश बैस यांचे अभिभाषण सुरु आहे (Maharashtra Budget Session 2023 news update)

शिंदे-फडणवीस सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. हे अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार आहे. 9 मार्च रोजी देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करतील. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाची सर्वांनाच उत्सुकता आहे.

काल (रविवारी) शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेनेच्या सर्व 55 आमदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. या 55 आमदारांमध्ये आदित्य ठाकरे यांचाही समावेश आहे. पण हा व्हिप आम्हाला मिळालाच नाही, असे ठाकरे गटाच्या आमदारांनी सांगितले.

Eknath Shinde - Devendra Fadnavis - Ajit Pawar
Pune : मोठी बातमी ; राष्ट्रवादीच्या तक्रारीनंतर भाजपचे उमेदवार रासने यांच्यावर गु्न्हा दाखल

"आम्हाला कोणालाही व्हीप मिळालेला नाही. आम्हाला शिवसेना (शिंदे गट) व्हीप बजावू शकत नाही. त्यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात व्हीप न बजावण्याचे मान्य केले होते. जर त्यांनी असे केले तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. न्यायदेवता आम्हाला न्याय देईल," असे ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी माध्यमांना सांगितले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या दालनात आज विरोधी पक्षांची बैठक झाली. विविध मुद्यांवर सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनीती या बैठकीत ठरविण्यात आली आहे.

Eknath Shinde - Devendra Fadnavis - Ajit Pawar
Jaykumar Gore In Budget Session : डॉक्टरांचा सल्ला धुडकावत जयकुमार गोरे ‘वॉकर’च्या साहाय्याने पोचले अधिवेशनाला

8 मार्च रोजी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात येणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प 6 लाख कोटी रुपयांचा असणार आहे. अधिवेशनात कांद्याचे गडगडलेले दर, बिघडलेली कायदा सुव्यवस्था, सरकारच्या प्रसिद्धीवर होणारा वारेमाप खर्च तसेच जिल्हा नियोजन समितीची रखडलेली विकासकामे आदी मुद्दे कळीचे ठरणार आहेत.

राज्यातील सत्तासंघर्षांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे पुढचे दोन आठवडे कोणीही म्हणजे शिंदे आणि ठाकरे गटाने व्हीप बजाऊ नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी शिंदे गटाने म्हणजेच शिवसेना पक्षाने ठाकरे गटाच्या 15 आमदारांना व्हीप बजावल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com