Maharashtra Budget Session: आजपासून सुरु होणारे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हं : विरोधकांची रणनीती..

Maharashtra Budget Session LIVE : अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला (रविवारी) आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता.
Devendra Fadnavis-Eknath shinde
Devendra Fadnavis-Eknath shindeSarkarnama

Budget Session News: आजपासून (सोमवार) शिंदे आणि फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे.

हे सत्र सोमवार ते 24 मार्चपर्यंत चालणार आहे. 9 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे. अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांच्या अभिभाषणाने होईल. आगामी निवडणुकीसाठी हे बजेट शिंदे फडणवीस सरकारसाठी अत्यंत महत्वाचा मानलं जात आहे. या बजेटकडून महाराष्ट्रातील जनतेच्या खूप अपेक्षा आहेत.

Devendra Fadnavis-Eknath shinde
Assembly Elections : मतदानास सुरवात ; मेघालयात बहुरंगी लढत ; नागालँडमध्ये 'नो टू नोट..येस टू व्होट

शिवसेना (Shiv Sena Symbol) हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे गट अधिक आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हं आहेत.विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला (रविवारी) आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात'या'मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

  1. सर्व पक्षांनी मिळून लोकायुक्त कायदा करण्यासाठी मदत करावी.

  2. शिंदे-ठाकरे वादावर 28 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

  3. सत्ताधारी- विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा टप्पा सुरू झाला आहे.

  4. त्याचा परिणाम संपूर्ण अधिवेशनात दिसून येणार आहे.

  5. 2 मार्च रोजी राज्यातील दोन विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल लागणार आहेत.

  6. सरकारी कर्मचाऱ्यांनी 14 मार्चपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.त्यामुळे अधिवेशन चांगलेच गदारोळाचे होणार

  7. शिंदे- फडणवीस सरकारवर हल्ला करण्यासाठी विरोधकांकडे सर्व शस्त्रे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com