Gulabrao Patil On Sanjay Raut: विधिमंडळाला चोरमंडळ म्हणणारी ही कुणाची औलाद ? ; गुलाबराव पाटील राऊतांवर भडकले...

Maharashtra Budget Session 2023 LIVE Updates : . विधीमंडळाचा मान राखायचा असेल तर आज त्यांनी खासदारांचा राजीनामा द्यावा..
Maharashtra Budget Session 2023 LIVE Updates :
Maharashtra Budget Session 2023 LIVE Updates :Sarkarnama

Maharashtra Budget Session News : "विधिमंडळ नाही हे चोरमंडळ आहे, ही बनावट शिवसेना आहे. ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे," असे वादग्रस्त विधान खासदार संजय राऊत यांनी नुकतेच केले आहे. राऊत कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. यावर शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी राऊतांना खडेबोल सुनावले आहेत.

"संजय राऊतांनी शिवसेनेचा सत्यानाश केला आहे.आम्हाला चोर म्हणतात, आम्ही चाळीस चोरांनी त्यांना निवडणूक दिले आहे. आमच्या मतांवर ते खासदार झाले.चोरांच्या मतावर निवडणूक आलेल्या राऊातांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा," अशी संतप्त भावना गुलाबराव पाटलांनी यावेळी व्यक्त केली.

Maharashtra Budget Session 2023 LIVE Updates :
Sanjay Raut : बच्चू कडूंना राऊत म्हणाले, 'तुमने बेवफाई की..,तुम आंखे नहीं मिला सकते..' ; शेतकऱ्याचा video व्हायरल..

गुलाबराव पाटील म्हणाले, "विधिमंडळाला चोरमंडळ म्हणणारी ही कुणाची औलाद आहे ? सभागृहाला एक गरिमा आहे. लोकांच्या मतावर आम्ही येथे निवडणूक आलो आहोत. राऊतासारखे मागच्या दरवाजाने आलो नाही. राऊतांनी शिवेसनेची वाट लावली. उरलेल्या १६ चीही वाट लावतील. उद्धव ठाकरेंनाही उल्लू केलं. ३५-४० वर्ष वर्षे काम करणाऱ्यांची वाट लावली. शिवेसनेची वाट लावण्याऱ्याने या सभागृहाचा अपमान केला आहे. चार लाख लोकांतून निवडून येतो, चोर नाही. या चोराने आमची मते घेतली आहे. विधीमंडळाचा मान राखायचा असेल तर आज त्यांनी खासदारांचा राजीनामा द्यावा,"

Maharashtra Budget Session 2023 LIVE Updates :
Pune Bypoll News : ज्योतिषाचे भाकीत खरे ठरणार ? ; भाजप चिंचवडमध्ये गड राखणार, पण कसब्यात..

राऊतांनी विधिमंडळ सदस्यांना चोरमंडळ संबोधल्याने विधान सभा आणि विधान परिषदेत आज राडा झाला. कामकाज सुरू होताच विधान सभेत आशिष शेलार आणि अतुळ भातखळकर यांनी त्यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची मागणी केली. विधान परिषदेतही यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली.

विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. संजय राऊतांच्या वक्तव्याची पडताळणी हक्कभंग समितीकडून केली जाईल. त्यानंतर, ८ मार्चला याबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असं नार्वेकरांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com