अन् आदित्य ठाकरेंनी भाजपवाल्यांचा पेनच पळवला

Maharashtra Budget Session: विधान भवनाच्या पायऱ्याजवळ लावलेल्या बॅनरवर देवेंद्र फडणवीसांनी पहिली सही करत मोहिमेला सुरुवात केली
अन् आदित्य ठाकरेंनी भाजपवाल्यांचा पेनच पळवला
Maharashtra Budget Session 2022/ Aditya Thackeray Latest News | Maharashtra Budget Session NewsSarkarnama

मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget Session 2022) गुरुवार (३ मार्च) पासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या दुसरा दिवसही चांगलाच वादळी ठरला. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजप आमदारांनी यावेळी स्वाक्षरी मोहीमही राबवली.

विधान भवनाच्या पायऱ्याजवळ लावलेल्या बॅनरवर देवेंद्र फडणवीसांनी पहिली सही करत मोहिमेला सुरुवात केली. तर, विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीही जाता जाता सही केली. त्यामुळे अनेकांच्या भुवयाही उंचावल्या. मात्र यावेळी एक गमतीशीर प्रकार घडला. भाजप नेते स्वाक्षरी करत असताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) स्वाक्षरीचा पेनच घेऊन निघून गेले.

Maharashtra Budget Session 2022/ Aditya Thackeray Latest News | Maharashtra Budget Session News
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पोपट रोज बोलतो आहे, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

विधान भवनाच्या पायऱ्याजवळ लावलेल्या बॅनरवर देवेंद्र फडणवीसांनी पहिली सही करत मोहिमेला सुरुवात केली. त्यानंतर अनेक भाजप नेत्यांनीही त्यावर सह्या केल्या. नरहरी झिरवळ तिथे आले असता भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी झिरवळ यांच्याकडे सही करण्यासाठी पेन दिला आणि त्यांनी सही केली. त्यानंतर मंगेश चव्हाण यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांनाही सही करण्याची विनंती केली. पण आदित्य ठाकरे पेन घेऊन तिथून निघून गेले.

दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना म्याव म्याव असा आवाज काढत डिवचले होते. पण यावेळी आदित्य ठाकरेंनी भाजपच्या खेळीला चकवा देत भाजपवाल्यांचा पेन पळवल्याने राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

यावेळी मंगेश चव्हाण यांनी नवाब मलिक यांच्यावर आगपाखड केली. देशद्रोह्याशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी नरहरी झिरवळ यांनी समर्थन दिले आहे. त्यांनी अध्यक्ष म्हणून जनतेच्या दृष्टिकोनातून विचार करुनच आपली भूमिका पार पाडली आहे, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in