Sanjay Raut News : संजय राऊत वक्तव्यावर ठाम ; म्हणाले, 'त्यांना' बाहेर 'चोरमंडळच' म्हणतात..'

Maharashtra Budget : मी देशातल्या मोठ्या सभागृहाचा सन्माननीय सदस्य..
Maharashtra Budget Session : Sanjay Raut
Maharashtra Budget Session : Sanjay RautSarkarnama

Maharashtra Budget : शिंदे-भाजप सरकारने तपास यंत्रणांच्या माध्यमातून किरीट सोमय्यांसारख्या २८ चोरांना क्लिनचीट देण्याचा उपक्रम राबवला आहे. हे विधीमंडळ नाही, चोरमंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष थोडीच सोडणार आहे. आम्ही पक्षातच राहणार आहोत, पदे आम्ही ओवाळून टाकतो, अशी घणाघाती टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती.

Maharashtra Budget Session : Sanjay Raut
Darekar : आपण सारेच चोर आहोत, म्हणत दरेकर झाले आक्रमक, म्हणाले राऊतांना अटक करा !

संजय राऊतांच्या या वक्तव्यावर राज्य विधिमंडळामध्ये जोरदार घमासान घडून आला. संजय राऊत यांच्यावर हक्कभंग दाखल करण्यात यावा, अशी मागणी सत्ताधारी आमदारांकडून आली. याबाबत दोन दिवसात विचार करून निर्णय घेऊ, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हंटले आहे. यावर आता पुन्हा राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे.

संजय राऊत म्हणाले, 'मी देशाच्या सर्वोच्च सभागृहाचा सदस्य आहे. विधीमंडळ असेल, संसद असेल सर्वच सभागृहाचा मी आदर करतो. शिवसेनेने संसदीय लोकशाहीवर कायम विश्वास ठेवलेला आहे. माझ्या विरोधात विधिमंडळात गदारोळ झाला, पण माझ्या बोलण्यामागची भावना समजून घ्यावी, मी कोणत्या संदर्भात म्हणालो, हे समजून न घेता, एकांगी पद्धतीने कारवाई होत असेल तर, हे लोकशाही परंपरेला धरून नाही.

Maharashtra Budget Session : Sanjay Raut
Supreme Court hearing : शिंदे गटाच्या युक्तीवादावर सरन्यायाधीशांची टिपण्णी; महत्त्वपूर्ण ठरणार...

"माझ्यावर हक्कभंग आणण्याचा पूर्ण अधिकार सदस्यांना असू शकतो. पण मी काय म्हणालो? ते समजून घेतलं पाहिजे. विरोधकांना देशद्रोही म्हंटलं जातं. ज्या पद्धतीने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्षाची चोरी केली आहे. काही लोकं विधिमंडळात गेले. आमच्यावरती हल्ले करतात. विधिमंडळाबाहेर यांना चोर म्हंटलं जातं," असे संजय राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in