
Maharashtra Budget 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या आणि महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये शेतकरी, अंगणवाडी सेविका, पर्यावरण, उद्योग, वाहतूक व्यवस्था इत्यादीबाबत महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये नोकरदार महिलांसाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आले.
नोकरदार महिलांसाठी ५० वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. दोन योजनांचं एकत्रिकरण करून शक्तिसदन ही योजना लागू करण्यात येणार आहे. शहरी भागात नोकरीसाठी असणाऱ्या महिलांसाठी केंद्र सरकारच्या साहाय्याने ५० वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत ,अशी घोषणा फडणवीसांनी केली.
अडचणीतील महिलांसाठी लैंगिक शोषणातून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्ज्वला योजनांचे एकत्रिकरण करून केंद्राच्या मदतीने शक्तिसदन ही नवीन योजना आणली जाणार आहे.या योजनेत महिलांना आश्रय, कायद्याविषयी सल्ला व मार्गदर्शन देण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच आरोग्यसेवा व समुदेशन करण्यात येणार आहे.
आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी अनेक महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्क्यांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाचा महिलांना प्रवास करताना फायदा होणार आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.